आयात निर्यातीचे व्यापक धोरण अवलंबविण्याची गरज : आढळराव पाटील

नियोजनाचा अभाव असल्याची सरकारवर टीका

नारायणगाव – सरकारच्या नियोजन अभावामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नाही. या करिता सरकारने आयात निर्यातीचे व्यापक धोरण अवलंबविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले. ग्रामोन्नती मंडळ कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव येथे ग्लोबल फार्मर्स कृषी प्रदर्शन पीक परिसंवाद आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी ते बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा, कृषि विस्तार संचालक डॉ. किरण कोकाटे, माजी सनदी आधिकारी अरविंद झांब, सहाय्यक जिल्हाधिकारी खेड आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आयुष प्रसाद, ग्रामोन्नती मंडळ कृषि विज्ञान केंद्राचे चेअरमन अनिलतात्या मेहेर, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्यवाह रविंद्र पारगावकर तसेच मंडळाचे संचालक उपस्थित होते.

खासदार आढळराव पाटील म्हणाले, उत्तर पुणे जिल्हा हा भाजीपाला उत्पन्नात अग्रेसर असून प्रक्रिया उद्योग आणि मूल्यवर्धनात कृषी पदाणिकाऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. अल्पावधीतच नारायणगावच्या कृषि विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांसाठी नाविन्यापूर्ण पीक प्रात्यक्षिकाबरोबर मोलाचे मार्गदर्शन करून सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या केंद्राने उभारलेले उपक्रम राज्यात पथदर्शी ठरत असून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतील, असा विश्‍वास आढळराव पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी कृषी विज्ञान केंद्राने उभारलेल्या फळे व भाजीपाला प्रक्रिया प्रयोगशाळेचे उद्‌घाटन आणि घाडीपत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांनी केले. तसेच मान्यवरांच्या हस्ते प्रगतशील शेतकरी पुरस्कार संतोष बांगर, प्रगतशील महिला शेतकरी पूनम नवले, कृषि उद्योजक आदेश काशिद, श्रीकांत वायाळ यांना ग्रामोन्नती कृषि सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कृषि विस्तार संचालक डॉ. किरण कोकाटे म्हणाले, उत्पादित झालेल्या मालावर प्रक्रिया करणे व त्या माध्यमातून त्याची विक्री व्यवस्थापन करणे ही आजची गरज आहे. कमी पिकवा; परंतु दर्जेदार पिकवा असा सल्ला यावेळी कोकाटे यांनी दिला. गेल्या सात वर्षांपासून केव्हीकेच्या कामाचा आलेख चढता असून काम शेतकऱ्यांच्या प्रती उल्लेखनीय आहे.

“भारतीय शेती ही वातावरणाच्या बदलामुळे चिंतेची ठरत संरक्षित शेती फायद्याची ठरणार आहे. शेतकऱ्यांनी जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खत नियोजन करून उत्पादन खर्च कमी करण्यावर प्रयत्न केला पाहिजे.
-डॉ. के. पी. विश्वनाथा कुलगुरू राहुरी कृषि विद्यापीठ

“फार्मर्स प्रोड्यूसर कंपन्यांच्या माध्यमातून कोल्ड स्टोरेज, वाहतूक साखळी, प्रक्रिया व मूल्यवर्धित पदार्थांची निर्मितीत पुढाकार घेणे गरजेचे आहे. कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था खरोखर उत्कृष्ट काम करतात. यासारख्या संस्थांना सरकारने आर्थिक पाठबळ देऊन मोठे करायला हवे. तर देश प्रचंड गतीने प्रगती करेल.                                                                                                                                                  -आयुष प्रसाद, सहाय्यक जिल्हाधिकारी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)