वाड्या वस्त्यावरील मुलींची पायपीट थांबली

भिगवण – सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मदनवाडी (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थीनीना महिला व बालकल्याण योजने अंतर्गत मोफत सायकलचे वाटप करण्यात आले.

जि. प. प्राथमिक शाळा मदनवाडी येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, सरपंच आम्रपाली बंडगर, ग्रामसेवक गाताडे, संतोष बंडगर, मुख्याध्यापक संजय बंडगर, अजिनाथ वाघमारे, दिलीप बनकर, वर्षा बंडगर, सुनंदा मुळे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मदनवाडी गाव वाडीवस्तीवर विखुरलेले असल्याने मुलींना येण्या-जाण्याची सोय व्हावी म्हणून सायकल वाटप करण्यात आल्याचे बंडगर यांनी सांगितले. यावेळी शाळेतील पूजा सरक, काजोल जगताप, दिव्या देवकाते, प्राजक्‍ता देवकाते, सिद्धी सवाणे, भक्‍ती सवाणे, श्रावणी सकुंडे, जान्हवी जाधव, भारती पवार, स्नेहलता बंडगर विध्यार्थीनींना सायकल वाटप करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)