कोथळे येथे क्रीडा सप्ताह उत्साहात

जेजुरी  -कोथळे येथील श्री. मल्हार शिक्षण मंडळाच्या विद्या महामंडळ प्रशाला व गुणगौरव प्रतिष्ठानच्या वतीने क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्‌घाटन जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी दत्ता भोईटे, जेजुरी पोलीस स्टेशनचे संदीप कारंडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर भोईटे, प्रल्हाद आव्हाड, भूषण कदम उपस्थित होते. आम्हाला पालक आणि शिक्षक समजावून घेत नाहीत, असे नेहमी विद्यार्थांना वाटते. मात्र, आई, वडील, पालक आणि शिक्षक हे नेहमीच मुलांच्या हिताचा विचार करतात. ते रागावले तर राग येवू देवू नका. पालक आणि शिक्षकांविषयी असणारा भ्रम दूर करा. आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी मोबाईल आणि टीव्ही पासून दूर रहा, असे आवाहन माने यांनी केले.

प्रास्ताविक मुख्याध्यापक एच. डी. दरेकर यांनी केले. सूत्रसंचालन नितीन राउत यांनी केले. आभार संदीप जगताप यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)