भारतीय अर्थव्यवस्थेला गती : भालेकर

बारामती – भारतीय अर्थव्यवस्थेला चांगलीच गती प्राप्त झालेली आहे. त्याचप्रमाणे भारत हे बलशाली राष्ट्र बनत आहे. ही आनंदाची व समाधानाची बाब आहे. परंतु, सर्वसामान्य नागरिकांना अर्थकारणाविषयी जाणीव जागृती होऊन सहभागाची गरज आहे. भविष्याचा वेध घेण्याची भारतीयांची इच्छा आकांक्षा हीही प्रेरणादायी आहे. स्पर्धेचे जग अधिकाधिक तीव्र बनत असून युवा शक्‍तीला एक प्रकारचे आवाहनच आहे, असे मत युनिक ऍकॅडमीचे तज्ज्ञ मार्गदर्शक व अर्थशास्त्राचे अभ्यासक कैलास भालेकर यांनी व्यक्‍त केली.

शिवनगर विद्या प्रसारक मंडळ माळेगाव व द युनिक ऍकॅडमी यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षेची तयारी व अर्थशास्त्राचे महत्त्व या विषयावर भालेकर बोलत होते.

याप्रसंगी माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजनकुमार तावरे, शिवनगर विद्याप्रसारक मंडळाचे विश्‍वस्त संग्रामसिंह काटे-देशमुख, संजय तावरे,  शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे सचिव प्रमोद शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील, प्राचार्य डॉ. रामचंद्र पवार, डॉ. नंदकुमार खाचणे, प्रा. आर. एम. वाबळे, प्रा. मनोज वाबळे, कार्यक्रमाचे संयोजक संतोष गोरे, प्रा. सुरज जगताप, युनिक ऍकॅडमीचे वसंत घुले आदि मान्यवर उपस्थित होते.

रंजनकुमार तावरे म्हणाले येणारा काळ हा अधिक स्पर्धात्मक असून युवकांची कसोटी पाहणारा ठरणार आहे. त्यामुळे ज्ञानाशिवाय कोणतेही पर्याया उपलब्ध नाहीत, असे त्यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)