खेडमध्ये पहिले मराठा जात प्रमाणपत्र वितरित

राजगुरूनगर – खेड तालुक्‍यात पाहिले मराठा जात प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. प्रांत तथा सहायक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या तुषार राऊत याला देण्यात आले.

मराठा समाज आरक्षणाचा निर्णय न्यायालयीन प्रक्रियेत अडकला असताना राज्य सरकारने याबाबत महसूल विभागामार्फत जात प्रमाणपत्र वितरीत करण्याचे आदेश दिले आहेत. महसूल विभागाने आवश्‍यक कागदपत्रांच्या पडताळणी करून मराठा जातीचे प्रमाणपत्र वितरण करण्यास सुरुवात केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खेड तालुक्‍यातील पाहिले प्रमाणपत्र बुधवारी (दि. 2) प्रांताधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी वितरित केले. खेड तहसीलदार कार्यालयातील सुविधा केंद्राच्यावतीने प्रस्ताव तयार करून ऑनलाईन पद्धतीने तहसीलदार, प्रांत कार्यालयीन पातळीवर कागदपत्राची छाननी केल्यानंतर प्रांत यांच्या सहीने जातीचा दाखला दिला जात असल्याचे तहसीलदार सुचित्रा आमले यांनी सांगितले. याप्रसंगी नायब तहसीलदार लतादेवी वाजे, नाना उगले यांच्यासह मंडल अधिकारी
उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)