वाघळवाडी ग्रामपंचायतीत एक लाखाचा भ्रष्टाचार?

सरपंच, ग्रामसेवक, ठेकेदार यांची मिलीभगत

-उपसरपंचासह सात सदस्यांचा आरोप

-शाळेचे शौचालय न बांधता दाखवला 99 हजार 700 रुपयांचा खर्च

सोमेश्‍वरनगर – वाघळवाडी (ता. बारामती) येथील जिल्हा परीषद शाळेतील शौचालयाचे संपूर्ण बांधकाम शाळेला उपलब्ध झालेल्या निधीतून झाले असताना सरपंच, ग्रामसेवक आणि ठेकेदार यांनी शौचालयाचे बांधकाम न करता निधी खर्च केल्याचे दाखवून 99 हजार 700 रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप उपसरपंचासह सात सदस्य अशा आठ जणांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उपसरपंच जितेंद्र सकुंडे, सदस्य हेमंत गायकवाड, दीपक दणाणे, दत्तात्रय दडस, सदस्या लता शिंदे, श्रद्धा भुजबळ, सुरेखा सावंत, ज्योती कडाळे या आठ जणांनी हा आरोप केला आहे. तसेच त्यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बारामतीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे.

बारामती पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडे असलेल्या अंदाजपत्रक रजिस्टरमध्ये जिल्हा परिषद शाळेसाठी शौचालय बांधण्यासाठी 2 लाख 81 हजार रकमेचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून ऑक्‍टोबर 2018 मध्ये तयार करण्यात असल्याचे रजिस्टरमध्ये नोंद आहे. कामाच्या मूल्यांकनानुसार या अंदाजपत्रकात 2 लाख 81 हजार रक्कमेपैकी 99 हजार 700 रक्कम ठेकेदार संतोष महानवर यांना दिली आहे. प्रत्यक्षात हे शौचालय निष्पादन सीमाशुल्क विभाग मुंबई यांच्या निधीतून बांधले असताना ग्रामपंचायतीच्या निधीतून बांधले असल्याचे दाखवून 99 हजार 700 एवढी रक्कम महानवर यांना सरपंच व ग्रामसेवक यांनी दिली आहे.

दरम्यान, याबाबत ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार करून कळविले होते. सदस्यांनी मासिक सभेत कोणताही ठराव व मंजुरी नसताना हा खर्च करून भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप जितेंद्र सकुंडे, हेमंत गायकवाड, प्रवीण सकुंडे यांनी केल आहे. याबाबत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कायद्यानुसार पदाचा दुरुपयोग केल्याबद्दल सरपंच नंदा सकुंडे,
ग्रामसेवक सुभाष चौधर यांचे अधिकार काढून शिस्तभंगाची व फौजदरी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

“शौचालयाचे बांधकामाचे पैसे हे पंचायत समितीकडून रितसर निविदा नुसार उर्वरित रक्कम संबधित ठेकेदाराला दिलेले आहेत. संबंधित कामात कोणताही भ्रष्टाचार झालेला नसून गावात चाललेली विविध विकासकामे विरोधकांना पाहवत नाही. उगाच राजकीय द्वेषापोटी निरर्थक विरोध आरोप करत आहेत. जर काही राजकीय विरोधकांना भ्रष्टाचार झालेला वाटत असेल तर आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत.

– नंदा सकुंडे, सरपंच, वाघळवाडी ग्रामपंचायत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)