बिबट्यांनी केली अनेक रानकुत्री फस्त

संग्रहित छायाचित्र...

ऊस तोडणी सुरू झाल्याने बिबटे सैरभैर : पिंजरा लावण्याची मागणी

लाखणगाव – आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील विविध गावांमध्ये बिबट्यांची दहशत कायम असून अनेक वाड्या-वस्त्यांवरील मोठ्या प्रमाणात रानकुत्री बिबट्यांनी फस्त केली आहेत. त्यामुळे तेथील कुत्र्यांची संख्या घटून आश्रयासाठी अनेक कुत्र्यांनी गावाठाणात आश्रय घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्या उसाची तोडणी सुरु झाल्याने बिबटे सैरभैर झाले आहेत. बिबटे इकडे-तिकडे फिरताना पाहावयास मिळत आहेत. बिबटे हे कुत्र्यांवर हल्ले करुन त्यांना फस्त करीत आहेत. अनेक वाड्या-वस्त्यांवर असणारी पाळीव व मोकाट कुत्रे तसेच घरापुढे पाळलेली कुत्री बिबट्यांची शिकार बनत आहेत. कुत्र्यांची संख्या कमी झाल्याचे पहावयास मिळत आहे.

शिकार झाल्यानंतर कुत्र्यांचे मृत शरीरही सापडत नाही. तसेच याबाबात कुणी जास्त तक्रार करीत नसल्याने कुत्र्यांवरील हल्ल्यांची चर्चाही होत नाही. बिबट्यांच्या उपद्रवामुळे वाड्या-वस्त्यांवरील कुत्र्यांची संख्या मात्र झपाट्याने कमी झालेली आहे.
सुरक्षिततेसाठी गावठाण क्षेत्रातील कुत्र्यांची संख्या मात्र, वाढली आहे. त्यामुळे गावठाण भागात कुत्र्यांचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

तर वाड्या-वस्त्यांवर मात्र घराच्या सुरक्षिततेसाठी पाळलेली कुत्री कमी होऊ लागली आहेत. हे चित्र अनेक गावांमध्ये दिसून येत आहे. बिबट्या प्रवण क्षेत्रात पिंजरे लावूनही बिबट्यांचा बंदोबस्त होत नाही. बिबटे पिंजऱ्यात न अडकता गुंगारा देतात. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून लोकांना सावधानता बाळगावी लागत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)