गोधनाची बेकायदा वाहतूक करणारे दोघे अटकेत

सासवड – परिंचे (ता. पुरंदर) येथे गाईंची बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तसेच टेम्पो मधील चार गाई व दोन वासरांना ताब्यात घेतले आहे.

अटक केलेल्या आरोपींचे नाव नारायण जगताप व नितीन दत्तात्रय भोसले (रा. भोंगवली, ता. भोर) आहे. सासवड पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार गोरक्षक दीपक बाजीराव गोरगल व आदित्या दुर्गाडे यांना पिकअपमध्ये (क्रमांक एम. एच. 11 बी. एल. 1350) कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तपासणी केली असता गाडीमध्ये चार गाई व दोन वासरे असल्याचे निदर्शनास आले.

गाडीमध्ये जनावरांना चारा-पाण्याची व्यवस्था केलेली नव्हती. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून सदर गुन्ह्याची माहिती कळविली. त्यानुसार पोलिसांनी जगताप व भोसले यांच्या विरोधात कारवाई केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)