खोडव्यास प्रतिटन 250 रुपये अनुदान द्या

file photo

जिल्हा शेतकरी कृती समितीची “सोमेश्‍वर’कडे मागणी

-उसाच्या लागवडीत वाढ होण्यासाठी उपाय योजना करण्याची मागणी

-संचालक मंडळाने जाहीर केले 100 रूपये प्रति मे. टन अनुदान

सोमेश्‍वरनगर -सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याने सुरू लागण व खोडव्यासाठी यंदा किमान 250 रूपये प्रति मे. टन अनुदान द्यावे, अशी मागणी पुणे जिल्हा शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

यंदाचा चालू गळीत हंगामाचा विचार करता मागील गळीत हंगामात 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2017 अखेर 22266 एकर आडसाली, पूर्व हंगामी सुरू व खोडवा ऊसाच्या नोंदी कारखाना दप्तरी झाल्या होत्या; परंतु हंगाम 19 व 20 साठी दि. 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत कारखान्याकडे 19202 एकर आडसाली, पूर्व हंगाम सुरू व खोडवा उसाच्या नोंदी कारखान्याकडे झाल्या आहेत. यासाठी येणाऱ्या हंगामात 2019-20 यासाठी सुमारे 3 हजार 64 एकर उसाची लागवड कमी झाली आहे.

1 जानेवारीपासून उसाच्या लागवडीत वाढ होण्यासाठी व सभासदांना खोडवा राखण्यासाठी अनुदान दिले पाहिजे. कारण दुष्काळामुळे सभासद अडचणीत आहेत. त्यामुळे कारखान्याला पुढील गळीत हंगामात उसाची कमतरता भासणार आहे. संचालक मंडळाने 100 रूपये प्रति मे. टन अनुदान जाहीर केले आहे ते अनुदान पुरेसे नसून 250 रूपये प्रति मे. टन जाहीर करावे, अशी मागणी कृती समितीने केली आहे.

सोमेश्‍वरचे संचालक मंडळ जवळच्या लोकांचे तोंडे बघून कार्यक्षेत्रातील ऊस आणत आहे. ही बाब कृती समितीच्या लक्षात आली आहे. तरी संचालक मंडळाने असे कृत्य बंद करावेत. मार्चपर्यंत कोणत्याही प्रकारचा गेटकेन किंवा बिगर सभसदाचा ऊस गाळपास आणू नये कारण स्वतः चेअरमन यांनी वेळोवळी सोमेश्‍वरच्या सभासदांचा सुमारे 12 लाख मे. टन ऊस आहे असे सांगितले आहे म्हणून 80 टक्के गाळप झाल्याशिवाय इतर ऊस आणू नयेत.

याउलट कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासदांचा जानेवारी ते मार्च अखेरपर्यंत ऊस गाळप करून सभासद खोडवा राखतील त्यामुळे सभासदांचा फायदा होईल. 19 व 20 च्या गळीत हंगामासाठी 250 रू. मे. टन अनुदान द्यावे त्यामुळे सभासद खोडव्याच्या मशागतीसाठी उपयोगी ठरेल, असे त्यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)