राजगुरूनगरात भूमिगत सांडपाणी व्यवस्थापन

राजगुरूनगर – राजगुरुनगर शहराच्या भूमिगत सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला राज्यशासनाच्या नगरविकास विभागाने मंजुरी दिली असून त्याकरिता तब्बल 38 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी दिली.

शहराला भीमा नदीवरील केदारेश्‍वर बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो. बंधाऱ्याच्या खालच्या बाजूला दूषित पाणी नदीत सोडला जात असल्याने नागरिकांना पुरविण्यात येणारे पाणी काही प्रमाणात दूषित येत होते. यावर उपाययोजना म्हणून बंधाऱ्यात सोडण्यात येणारे पाणी पाइपलाइनद्वारे बंधाऱ्याच्या खालच्या बाजूला सोडण्यात येत आहे. मात्र, हा तात्परता पर्याय होता. यावर कायमस्वरूपी मार्ग पालकमंत्री गिरीश बापट, भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाळा भेगडे, तालुका अध्यक्ष अतुल देशमुख यांच्या माध्यमातून या योजनेचा पाठपुरावा करण्यात आला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगरपरिषदेच्या माध्यमातून शास्रशुद्ध व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे पाठविण्यात आला होता. त्याला या विभागाने तांत्रिक मान्यता दिली. हा प्रकल्प अहवाल पुढील मान्यतेसाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे सादर केला. त्यास मान्यता देत तब्बल 38 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

राजगुरूनगर शहरात भूमिगत सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पासाठी 38 कोटी रुपये खर्च केले जाणार असून 90 टक्के रक्कम रुपये 34 कोटी 20 लाख रुपये अनुदान उपलब्ध होणार आहे. उर्वरित 10 टक्के रक्कम 3 कोटी 80 लाख रुपये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून राजगुरुनगर नगरपरिषदेने खर्च करायचा आहे.

यामध्ये मलनिःसारण योजनेमध्ये 6.7 एमएलडीचा सिव्हरेज ट्रीट्‌मेंट प्लांट, सिव्हरेज पंपिंग मेन, पंपिंग मशनरी, वेट वेल व पंप हाऊस, शहरातील 45 किमी लांबीचे मल:नित्सारनाचे नवीन पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. अगदी शहराच्या शेवटच्या भागात बंदिस्त गटार व्यवस्था केली जाणार आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर भीमा नदी दूषित होणार नाही. पर्यावरणाचे जतन होणार असल्याचे मांदळे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)