वाघोली (प्रतिनिधी) : पेरणे येथे गावठी दारूची हातभट्टी उधवस्त करून गाव व झोपडपट्टी परिसरात गावठी दारू विक्री करणाऱ्या पाच जणांवर लोणीकंद पोलिसांच्या डी बी पथकाने कारवाई केली. याप्रकरणी एका महिलेसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेरणे गावाच्या हद्दीत मौलाई चौक येथे राहते घराच्या पाठीमागे सिमेंटच्या टाकीमध्ये, ओढ्यालगत, एक महिला गावठी हातभट्टीची दारू काढत आहे अशी माहिती मिळाल्याने डी बी पथकाने सदर ठिकाणी छापा घातला. त्याठिकाणी महिला गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणाऱ्या साधनांसह मिळून आली. तिच्या ताब्यातील कच्चे रसायन, अल्युमिनिअमची चाटू, ताटली असा एकूण ४२ हजार रुपयांचा माल मिळून आला. हातभट्टी पोलिसांनी उध्वस्त केली आहे.
पेरणे गाव व झोपडपट्टी परिसरात अवैध गावठी दारू विक्री करणाऱ्या पाच जणांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वढू खुर्द येथे देखील हातभट्टीवर कारवाई करून रसायन व साहित्य असा एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला आहे. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हणमंत पडळकर, चांदीलकर, बाळासाहेब सकाटे, सदाशिव गायकवाड, विकास कुंभार, ऋषिकेश व्यवहारे, कीर्ती नरवडे यांनी केली आहे.