अवसरी शाळेचा शनिवारी शतकोत्तर सुवर्ण महोत्सव

अवसरी – अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचा शनिवारी (दि. 5) शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बंडेश हिंगे यांनी दिली.

या निमित्ताने शनिवारी सकाळी साडेआठ वाजता चित्ररथ मिरवणूक, दहा वाजता स्मरणिका प्रकाशन आणि सभागृहाचे उद्‌घाटन होणार आहे. दुपारी साडेबारा वाजता स्नेहभोजन, दुपारी दिड वाजता माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला आहे. त्यानंतर साडेतीन वाजता सारिका गायकवाड प्रस्तुत देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याशिवाय अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्‍वास देवकाते समवेत शाळेचे सर्व माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)