मोफत आरोग्य शिबिरांची गरज

माजी आमदार अशोक पवार यांचे मत : 500 नागरिकांची मोफत तपासणी

लोणी काळभोर -नियमित आरोग्य तपासणी सर्वसामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्‌या परवडत नाही. त्यामुळे मोफत आरोग्य तपासणी शिबिर वारंवार घेण्याची आवश्‍यकता आहे, असे मत शिरुर हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

थेऊरफाटा, कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील श्रीनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था व विश्‍वराज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप धुमाळ यांच्या वाढदिवसानिमीत्त मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन थेऊर फाटा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

उपक्रमाअंतर्गत कुंजीरवाडी पंचक्रोशीतील 500 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 76 नागरिकांना मोफत हृदयरोग, मोतीबिंदू, मुतखडा, हृदयाचे छिद्र, मणक्‍याची शस्त्रक्रिया, मणक्‍यांचे आजार, डायलिसिस, किमोथेरपी व श्रवण यंत्र इ . सेवा दिल्या गेल्या. तर 400 नागरिकांना रक्त तपासण्या, साखर तपासणी, इसीजी इत्यादी सेवांचा लाभ देण्यात आला. सर्व रुग्णांवर विश्‍वराज हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करण्यात येणार आहेत.

पवार म्हणाले की, अभिनव आरोग्यदायी उपक्रमाबाबत जनजागृतीची समाजाला गरज आहे. त्याची व्यापकता वाढवावी. याप्रसंगी कुंजीरवाडीच्या माजी आमदार अशोक टेकवडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार काळभोर, पंचायत समिती सदस्य सनी काळभोर, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्‍वर कटके, उपाध्यक्ष विश्‍वनाथ धुमाळ, कार्यकारी संचालक ज्ञानेश्‍वर धुमाळ, विश्‍वराज हॉस्पिटलचे डॉ मंगेश दाते, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. निलिमा इनामदार आदी उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या 2019 सालच्या दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)