घरफोडीत 4 लाखांचा ऐवज लांबविला

पुणे – घराच्या उघड्या राहिलेल्या दरवाजातून चोरट्याने आत प्रवेश केला. तसेच बेडरूमधील कपाटातून 4 लाख 7 हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने चोरून नेले. कोथरूड परिसरातील हॅप्पी कॉलनी मेघदूत सोसायटी गल्ली क्र. 4 मध्ये हा 31 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला.

याप्रकरणी साधना देव (वय- 57) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून कोथरुड परिसरात चोरीच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यामुळे नागरिकांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्याची मागणी केली आहे. पोलीस उपनिरीक्षक ए. एस. देशमुख हे पुढील
तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)