रात्रीच्या वेळी तरुणाला लुबाडले

पुणे – रात्रीच्या सुमारास चालत जाणाऱ्या एकट्या तरुणास अज्ञात दोघांनी आवाज देवून थांबविले. त्या तरुणाकडील दोन मोबाइल आणि रोख रक्कम, असा 36 हजार रुपयांचा ऐवज दोघांनी चोरून नेला.

हडपसर परिसरात टिव्हीएस शोरूमलगत कालव्याजवळ दि. 31 डिसेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. धमेंद्र दुबे (वय-24, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार अज्ञात दोघांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा तपास करीत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक अमोल काळे हे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)