बारामती नगराध्यक्षांचा भर सभेत रौद्ररूप

विरोधी नगरसेवकांनी अकार्यक्षमचा उल्लेख करताच तावरेंकडून राजीनाम्याचा इशारा

तुम्ही सगळे लिहून द्या…

मी गेली दहा वर्षे या सभागृहात आहे, प्रत्येकाचा मी सन्मान केला आहे, गेल्या बैठकीला एकेक करुन विषय घ्या असे म्हणताच माझ्यावर प्रशासनाची बाजू घेता असा आरोप केला गेला, हे चाललय तरी काय… बोलले तरी बोलतात, चारही दिशांनी मला टोचण्या देता का सगळीकडून….याला अर्थ नाही.तब्येत बरी नसून इंजेक्‍शन घेऊन मी आज इथे बसलीय तर शहराच्या विकासासाठी मी आलेय….कधीच कुठल्याही चुकीच्या गोष्टीला मी पाठीशी घालणार नाही… तुम्ही सगळ्यांनी लिहून द्या की या नगराध्यक्षा नको आहेत आम्हाला, या कार्यक्षम नाही..

बारामती – बारामती नगरपालिका या ना त्या कारणाने कायमच चर्चेत असते. आज (गुरुवारी) नगरपरिषदेत सुरू असलेल्या सभेत विरोधीनगरसेवकांनी कहरच केला. त्यांनी नगराध्यक्ष अकार्यक्षम असून त्यांचा प्रशासनावर नियंत्रणच नाही, असा उल्लेख केल्यानंतर उद्विग्न झालेल्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी थेट राजीनाम्याचाच इशारा दिल्यानंतर वातावरण चांगलेच तप्त झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र, विरोधी पक्षनेते सुनील सस्ते यांनी अखेर शब्द मागे घेत प्रशासनाला लेखी तंबी देण्याची मागणी केल्यानंतर प्रकरण शांत झाले मात्र, भर सभेत नगराध्यक्षांचे रौद्रारूप सगळ्या नगरसेवकांनी अनुभावला.

बारामती नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा सुरू असताना सत्ताधारी तसेच विरोधी नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. विविध विषयांवर चर्चा होत असतानाच विरोधी नगरसेवक सुनिल सस्ते यांनी अक्षेपार्ह विधान केले. या विधानाने नगराध्यक्षा चांगल्याच भडकल्या त्यांनी सस्ते यांना फैलावर घेतले.

नगराध्यक्ष म्हणून गेले दोन वर्षे मी प्रमाणिकपणे कामकाज करत आहे. मात्र, विकासकामे करताना विरोधकांसह चारही बाजूने माझ्यावर वेगवेगळे आरोप केले जात आहेत. प्रत्येक गोष्टीत खालीपणा देण्याचे काम केले जात आहे. गेली दाहा वर्षे मी या सभागृहात आहे. सहा नगराध्यक्षांच्या हाताखाली काम केले आहे, असे कधी घडले नाही. सध्या अशाप्रकारची परस्थिती जाणीवपूर्वक निर्माण केली जात असल्याचे उद्विग्नहून पौर्णिमा तावरे यांनी सांगितले.

त्याचवेळी नगराध्यक्षांबाबत केलेले विधानमागे घ्या असे गटनेते सचिन सातव यांनी सस्ते यांना सांगितले. तर नगरसेवक संजय संघवी यांनी त्याला दुजोरा देत माफीनाम्याची जोरदार मागणी केली. त्यानंतर इतर नगरसेवक देखिल अक्रमक झाले. अखेर सस्ते यांनी दिलगिरी व्यक्त आपले शब्द मागे घेतले अन्‌ या वादावर पडदा पडला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)