डोर्लेवाडी (प्रतिनिधी) : करोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार कडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. अश्या संकट समयीची जाण आणि सामाजिक बांधिलकी जपत आज सोमवारी ( ता.27 ) बारामती तालुक्यातील पिंपळी (बारामती) येथील पी.एम.डी. मिल्क फुड्स या परिवाराकडून पंतप्रधान सहाय्यता निधीला 51 हजार व मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 51 हजार असा मिळून 1 लाख दोन हजारांचा चेक बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे पी.एम.डी. मिल्क अँड फुड्स परिवाराकडून संस्थेचे संस्थापक हनुमंतराव मोहिते, संतोष ढवाण आणि दिलीप भाई परमार यांनी सुपूर्द केला.
देशावर आणि राज्यावर करोना सारख्या महामारी सारखे महाभयंकर संकट आलेल आहे यासाठी सामाजिक बांधिलकी जपत आमच्या वतीने पी.एम. आणि सी.एम. निधीला मदत केली आहे, त्याचबरोबर 500 गरजूवंत कुटुंबांना महिनाभर पुरेल अशा अन्नधान्याचे कीटचे वाटप करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील 25 गावांमध्ये टायरची फवारणी करण्यात आली. तसेच अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या 25 जणांना संस्थेच्या वतीने गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी पिंपळी ग्रामपंचायतचे सरपंच रमेश देवकाते ,पोलीस पाटील मोहन बनकर, श्रीराम सोसायटीचे चेअरमन रमेश ढवाण, ख.वि. संघाचे व्हाईसचेअरमन भाऊसाहेब भिसे, पिंपळी ग्रामपंचायतचे सदस्य सुनील बनसोडे, कालिदास खोमणे, मंगल खिलारे, उत्तम मदने, महेश चौधरी, स्वयंसेवक समीर गुजले ,सुनील तांदळे, आणि पी. एम. डी. मिल्क फूड्सचे स्टाप यांच्या उपस्थित होते.