ग्रामस्थांनी काढल्या जंगलातील जाळपट्ट्या

फलोदे (ता. आंबेगाव) :येथील ग्रामस्थ व वन अधिकारी यांनी जंगलाला आग लागू नये म्हणून जंगल परिसरात जाळपट्टा काढण्याचे काम केले.

मंचर – आंबेगाव तालुक्‍याच्या आदिवासी भागातील फलोदे येथील ग्रामस्थ व वन अधिकारी यांनी एकत्रित येऊन लोकसहभागातून गावातील जंगलाला आग लागू नये, म्हणून जंगल परिसरात जाळपट्टा काढण्याचे काम केले.

फलोदे गावाला लवकरच सामूहिक वनाधिकार प्राप्त होणार आहे. यामुळे गावालाच यापुढे जंगल संरक्षण व व्यवस्थापनचे काम करावे लागणार आहे. त्याची ही सुरुवात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी ग्रामस्थ आणि वन अधिकारी यांनी जंगलाचे संरक्षण कसे करता येईल याबाबत एकत्रित चर्चा केली. वनविभाग आणि ग्रामस्थ यांचा परस्पर संवाद हा जंगल व मानव विकासासाठी नक्‍कीच उपयुक्त ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)