बारामती नगरपरिषदेसमोर सापडलेल्या बॅगेत आढळले 13 लाख!

संग्रहित छायाचित्र...

बारामती  -बारामती नगरपरिषदेसमोर शुक्रवारी (दि. 29) सापडलेल्या बॅगेत 13 लाख रुपये असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी सांगितले.
बारामती नगरपरिषदेतील चोरीमागील नेमका सुत्रधार कोण याचा वेगाने तपास शहर पोलिसांनी सुरू केला आहे. दोन

दिवसांपूर्वी नगरपरिषद तिजोरी कटावणीच्या सहाय्याने तोडून घरपट्टी व इतर जमा असलेली 16 लाख 74 हजारांची रक्कम चोरट्यांनी चोरुन नेली होती. तर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास स्कूटीवरुन आलेल्या एका युवकाने पैशांची बॅग नगरपरिषदेच्या दारात ठेवली आणि तेथून त्याने पळ काढला.

बारामती नगरपरिषदेच्या एका कर्मचाऱ्याने ही घटना पाहिल्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर वेगाने हालचाली करुन पोलिसांनी या बॅगेजवळ असलेल्या दोघांना रात्री ताब्यात घेतले.रात्री पंचासमोर या बॅगेतील पैसे मोजले असता ही रक्कम जवळपास 13 लाखांच्या आसपास आहे. रात्रीच पोलिसांनी अनेक बाजू विचारात घेत तपास सुरु केला होता. या बाबत हाती काही ठोस माहिती आल्यावरच माहिती देऊ.

तसेच या चोरीमधील जवळपास 13 लाखांची रक्कम परत मिळाली असली तरी चोरीची धाडसी योजना कोणी आखली, यात नगरपरिषद व बाहेरचे कोणी सहभागी होते का, या चोरीचे धागेदोरे कोठपर्यंत आहेत या सर्वांचा सखोल तपास पोलीस यंत्रणा करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)