महाळुंगेतील विद्यार्थ्यांनी घेतले कुक्कुटपालनाचे धडे

मंचर – आंबेगाव तालुक्‍यातील महाळुंगे पडवळ येथील हुतात्मा बाबू गेणू विद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाळुंगे पडवळ परिसरातील बारवेमळा येथील प्रगतशील शेतकरी मुकुंद बारवे यांच्या कुकूटपालन व्यवसायाला भेट देऊन व्यवसायाची माहिती घेतली. क्षेत्रभेटीमध्ये इयत्ती 5वी ते 10वी अखेर एकूण 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

रयत शिक्षण संस्थेमार्फत राबविल्या जात असलेल्या गुरूकुल प्रकल्पांतर्गत वर्षभरात क्षेत्रभेटीचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेट आयोजित करून प्रत्यक्ष जोडव्यवसायाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली, अशी माहिती विद्यालयातील क्षेत्रभेट विभागप्रमुख गोरक्षनाथ केदारी यांनी दिली. याही वर्षी क्षेत्रभेटीचे आयोजन करून विद्यार्थ्यांना व्यवसाय, उद्योग यांची प्रत्यक्ष माहिती व्हावी, या हेतूने प्रगतशील शेतकरी मुकुंद बारवे यांनी स्वतःची यशोगाथा विद्यार्थ्यांना सांगताना शेतीबरोबर इतर पूरक व्यवसायांचीही माहिती करून दिली. त्यामध्ये मुख्यत्व: कुक्कुटपालन व्यवसायासंदर्भात विद्यार्थ्यांनी चर्चेच्या माध्यमातून विचारलेल्या विविध प्रश्‍नांची उत्तरे बारवे यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कुक्कुटपालन या पूरक व्यवसायासाठी लागणारे भांडवल, जागा व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन, मजूर व्यवस्थापन, पशुंचे संगोपन, अंड्यांचे मार्केटिंग अशा अनेक गोष्टींची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य संतोष निऱ्हाळी, शाखा गुरुकुल विभागप्रमुख नितीन बाणखेले यांची प्रेरणा या विद्यार्थ्यांना लाभली. क्षेत्रभेटीचे नियोजन विद्यालयातील उपशिक्षक शिवराम मुंजावडे, किरण गाढवे, लक्ष्मण पोटे, सीमा बाणखेले व माधुरी हगवणे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)