पुणे – धनंजय देसाईला अखेर जामीन

उच्च न्यायालयाने दिली मंजुरी

पुणे – हडपसर परिसरात पाच वर्षांपूर्वी झालेल्या मोहसीन शेख खून प्रकरणात हिंदू राष्ट्र सेनेचा धनंजय देसाई याला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. दरम्यान, येरवडा कारागृहात असलेल्या देसाई याला जामीन मिळाल्यानंतर शनिवारी दुपारी सोडण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देसाई याला दुपारी साडेचारच्या सुमारास येरवडा कारागृहातून सोडण्यात आले. त्यावेळी कारगृहाच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर देसाई याच्या समर्थकांनी गर्दी केली होती. त्यांनी मोटारी तसेच दुचाकी वाहने कारागृहासमोरील रस्त्यावर लावली होती. देसाई कारागृहातून बाहेर पडताच समर्थकांनी घोषणाबाजी सुरू करत रस्ता अडवला. त्यानंतर देसाई एका मोटारीत बसला आणि कारागृहासमोरील रस्त्याने मोटारीत बसून तेथून निघून गेला. दरम्यान, रस्ता अडविल्यामुळे या भागात काही वेळ कोंडी झाली. पोलिसांनी या भागातील कोंडी हटविण्यासाठी प्रयत्न केले. या प्रकरणी येरवडा पोलिसांकडे विचारणा करण्यात आली. तेव्हा कारागृहाच्या बाहेर बेकायदा जमाव जमविणारे तसेच रस्ता अडविणाऱ्या समर्थकांवर रात्री उशिरापर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नसल्याचे शनिवारी सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)