पुणे – पोलीस उपायुक्‍त ज्योतीप्रिया सिंह यांची “एनआयए’ संस्थेत वर्णी

पुणे – शहर पोलीस दलातील उपायुक्त ज्योतीप्रिया सिंह यांची बुधवारी दिल्लीतील राष्ट्रीय तपास संस्थेत(एनआयए) बदली करण्यात आली आहे. त्यांची पुढील चार वर्षांसाठी ही नियुक्ती झाली आहे. त्या सध्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या उपायुक्त म्हणून कार्यरत होत्या.

ज्योतीप्रिया सिंह या 2008 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी आपली प्रतिनियुक्ती दिल्लीत बदली व्हावी, यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर त्यांची या अर्जावरून बदली झाली आहे. पुण्यात सध्या त्या सायबर व आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. कॉसमॉस बॅंकेवरील सायबर हल्ला प्रकरणाच्या तपास त्यांच्याकडे आहे. तसेच बीटकॉईन फसवणूक प्रकरणाच्या एसआयटीच्या त्या प्रमुख आहेत. त्यांनी सायबर क्राईम सेल व विशेष शाखेत केलेल्या कामाचा अनुभव “एनआयए’मध्ये उपयुक्त ठरत असल्याचे सांगत पुण्यातील कारकीर्दीबद्दल समाधान मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)