पुणे – रोजचा खर्च रोज सादर करावा लागणार

निवडणूक उमेदवारांसाठी प्रशासनाची नियमावली

पुणे – लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारांना खर्चाची मर्यादा निश्‍चित करून देण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांना निवडणुकीमध्ये 70 लाख रुपयापर्यंतच खर्च करता येणार आहे. उमेदवारी अर्ज भरताना स्वतंत्र्य बॅंक खाते उघडून त्याचा तपशील उमेदवारी अर्जात नमूद करावा लागणार आहे. याच खात्यामधून उमेदवारांना खर्च करावा लागणार असून रोजचा खर्च निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून उमेदवारी खर्चाची मर्यादा वाढविण्यात आली आहे. निवडणूक खर्च देखरेख यंत्रणेनुसार निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराचे स्वतंत्र बॅंक खाते असणे आवश्‍यक आहे. निवडणुकीसाठीचा सर्व प्रमुख खर्च धनादेश किंवा ड्राफ्टच्या माध्यमातून केवळ याच बॅंक खात्यामधून करणे आवश्‍यक आहे.

गुन्हे आणि संपत्तीचीही माहिती
उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांना कुटुंबातील सदस्यांचे मागील पाच वर्षांतील उत्पन्नाची आकडेवारी सादर करावी लागणार आहे. त्याचबरोबर परदेशीत केलेली गुंतवणूक तेथील संपत्तीची माहिती उमेदवारी अर्जात भरावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)