एमटीबी राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्‍यपद स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कर्नाटक संघाचे वर्चस्व

15 व्या जायंट स्टारकेन एमटीबी राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्‍यपद स्पर्धा; 2 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कांस्य पदकांसह 7 पदकांची कमाई

पुणे  – 15 व्या जायंट स्टारकेन एमटीबी राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्‍यपद स्पर्धेचा पहिला दिवस कर्नाटकाच्या संघाने गाजवला. कर्नाटक संघाने पहिल्याच दिवशी 2 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कास्य पदकांसह 7 पदकांची कमाई केली आहे.
पुण्यातील सनीस वर्ल्ड येथे चालू असलेल्या या स्पर्धेत आज पहिल्या दिवशी मुलांच्या 19 वर्षांवरील एलिट गटात भारतीय सेनेने पुन्हा एकदा आपले वर्चस्व कायम राखले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही भारतीय सेनेच्या मुकेश कुमारने एलिट गटात 19.4 किमी अंतर 1 तास 1 मिनिट 46.600 सेकंदात पार पडत सुवर्ण पदकाची कामे केली तर याच प्रकारात भारतीय सेनेचा मागच्या वर्षीचा सुरवर्ण पदक विजेता रमेश आले याने कास्य पदकाची कमाई केली. पुरुष जुनिअर (17-18 वर्ष) गटात कर्नाटकच्या व्यशक के वी ने 14.7 किमीचे अंतर 48 मिनिटे आणि 20.290 सेकंदात पूर्ण करून सुवर्ण पदक मिळवले तर त्याच प्रकारात कर्नाटकच्या कमलराज एन ने 51 मिनिटे 11.09 सेकंदात अंतर पूर्ण करून रजत पदक मिळवले.

मुलींच्या जुनिअर (17-18 वर्षे) गटात महाराष्ट्राच्या प्रणिता सोमणने या हि वर्षी आपले सुवर्ण पदक कायम राखले आणि 9.8 किमीचे अंतर 45 मिनिटे 37.089 सेकंदात पूर्ण केले. याच प्रकारात कर्नाटकच्या सौम्या अंतापूर आणि दानम्मा गौरव यांनी अनुक्रमे रजत आणि कास्य पदक मिळवले.

मुलांच्या युथ (14 वर्षांखालील) गटामध्ये कर्नाटकच्या चारिथ गौडाने 9.8 किमीचे अंतर 32 मिनिटे आणि 42.911 सेकंदात पूर्ण करून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले तर केरळच्या नंदू गोपाळ ने 37 मिनिटे 44.196 सेकंदात शर्यत पूर्ण करून रजत पदक मिळवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)