पुणे – दस्त नोंदणी कार्यालय अचानक बंद

कर्मचारी निवडणूक प्रशिक्षणात : नागरिकांवर माघारी परतण्याची वेळ

पुणे – नोंदणी व मुद्रांक विभागातील कर्मचारी निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी मंगळवारी शहरातील काही दुय्यम निबंधक कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. यामुळे दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना पुन्हा माघारी परतावे लागले. कार्यालये अचानक बंद ठेवण्यात आल्याने गैरसोय झाल्याने नागरिकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली.

नोंदणी व मुद्रांक विभाग हा शासनाला महसूल देणारा महत्त्वाचा विभाग आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी होते. खरेदी-विक्री दस्ताची नोंदणी करण्यासाठी, मुद्रांक शुल्क भरण्यासाठी नागरिकांची लगबग असते. मार्चअखेर राहिलेले व्यवहार पूर्ण करण्यास नागरिक प्राधान्य देतात. त्यामुळे मार्चमधील शेवटचा आठवडा हा नोंदणी विभागासाठी महत्त्वाचा असतो. अशातच मंगळवारी नोंदणी विभागातील कर्मचारी निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी गेल्याने दुय्यम निंबधक कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. कार्यालये अचानक बंद असल्याने दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)