दुसऱ्या डावात विदर्भाची दमदार वाटचाल

तिसऱ्या दिवस अखेर 3 बाद 287 धावांची मजल

पुणे – गतविजेत्या विदर्भावर रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील सलामीच्या सामन्यातच फॉलोऑनची नामुष्की ओढवल्या नंतर दुसऱ्या डावातविदर्भाच्या संघाने तिसऱ्या दिवसअखेर 3 बाद 287 धावांपर्यंत मजल मारताना महाराष्ट्राच्या संघावर 64 धावांची आघाडी घेतली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तत्पूर्वी, यजमान महाराष्ट्राने पहिल्या डावात 343 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर वेगवान गोलंदाज समद फल्ला, अनुपम संकलेचा आणि सत्यजित बच्छाव यांच्या अचुक गोलंदाजीसमोर विदर्भाचा पहिला डाव 120 धावांवर आटोपला. महाराष्ट्राने त्यांना फॉलोऑन लादल्यावर दुसऱ्या डावात विदर्भाने दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद 46 धावा केल्या होत्या. तर, तिसऱ्या दिवशी कर्णधार फैझ फझलच्या नाबाद 116 धावा आणि अनुभवी फलंदाज वसीम जाफरच्या 63 धावांच्या खेळीच्या बळावर तिसऱ्या दिवस अखेर 3 बाद 287 धावांपर्यंत मजल मारली आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदानात सुरु असलेल्या सामन्यात महाराष्ट्राचा पहिला डाव 343 धावांवर आटोपला. त्यानंतर पहिल्या डावात विदर्भाची सुरुवात चांगली झाली नाही. पाचव्याच षटकात अनुपम संकलेचाने संजय रामास्वामीला यष्टिरक्षक मोटवानीकरवी झेलबाद केले आणि विदर्भाला पहिला धक्का दिला. तेराव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर निकित धुमाळने विदर्भाचा कर्णधार फैज फजलला पायचीत केले. त्यामुळे लंचला विदर्भाची 2 बाद 40 अशी स्थिती झाली होती.

21व्या षटकात धुमाळने गणेश सतीशला बच्छावकरवी झेलबाद केले. त्यानंतर पुढच्याच षटकात समद फल्लाने अनुभवी वसिम जाफरचा त्रिफळा उडविला, पुढच्याच चेंडूवर अक्षय वाडकरला यष्टिरक्षक मोटवानीकरवी झेलबाद केल्याने, विदर्भाची 22व्या षटकात 5 बाद 55 अशी अवस्था झाली होती. त्यानंतर अपूर्व वानखेडे आणि आदित्य सरवटे यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, 31व्या षटकात संकलेचाने वानखेडेला मोटवानीकरवी झेलबाद केले. त्यानंतर विदर्भाचा डाव स्थिरावला नाही. अखेरीस विदर्भाचा डाव 120 धावांवर आटोपला.

त्यानंतर दुसऱ्या डावात विदर्भाने आश्वासक सुरुवात केली. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा कर्णधार फैज फजल 20 धावांवर, तर संजय रामास्वामी 25 धावांवर खेळत होता. मात्र तिसऱ्या दिवशी विदर्भाने सावध फलंदाजी करताना दिवसभरात 3 गडी गमावताना 241 धावांची मजल मारली. यावेळी तिसऱ्या दिवसाचा खेल संपला तेंव्हा कर्नधार फैझ फझल नाबाद 116 धावांवर खेळत होता. तर, अक्षय वाडकर 31 धावा करुन त्याला साथ देत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)