पुणे आयटी कप क्रिकेट स्पर्धा : कॉग्निझंट आणि केपजेमिनी संघांची विजयी सलामी

पुणे – कॉग्निझंट आणि केपजेमिनी संघाने पुणे आयटी-कप टी-20 क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून विजयी सलामी दिली. पिंपरी-चिंचवड येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे.
या स्पर्धेतील पहिल्या लढतीत कॉग्निझंट संघाने शेवटपर्यंत रोमहर्षक झालेल्या लढतीत बीएनवाय मेलन संघावर तीन धावांनी मात केली.

यात कॉग्निझंट संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 5 बाद 128 धावा केल्या. कॉग्निझंटकडून अक्षय कुलकर्णीने 50 चेंडूंत 36, तर नीतेश सप्रेने 36 चेंडूंत 34 धावा केल्या. मेलन संघाकडून सुदेश ठाकूरने तीन, तर अजय कुलकर्णीने 2 गडी बाद केले. लक्ष्याचा पाठलाग करणा-या बीएनवाय मेलन संघाला 20 षटकांत 7 बाद 125 धावांत रोखण्यात कॉग्निझंटच्या गोलंदाजांना यश आले.

-Ads-

दुस-या लढतीत केपजेमिनी संघाने एलटीआय संघावर 7 गडी राखून मात केली. एलटीआय संघाने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 137 धावा केल्या. विक्रांत बांगरच्या अर्धशतकाच्या जोरावर केपजेमिनी संघाने विजयी लक्ष्य 17.5 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.

संक्षिप्त धावफलक –

1) कॉग्निझंट – 20 षटकांत 5 बाद 128 (अक्षय कुलकर्णी 36, नीतेश सप्रे 34, पुनित करण 18, अजय कुलकर्णी 4-0-12-2, सुदेश ठाकूर 4-0-16-3) वि. वि. बीएनवाय मेलन – 20 षटकांत 7 बाद 125 (सुदेश ठाकूर 29, मनीष सुपल 18, पुनित करण 4-0-12-2, राकेशसिंग 4-0-20-2). सामनावीर – पुनित करण.

2) एलटीआय – 20 षटकांत 7 बाद 137 (कुणाल देब 24, विकास भागवत 22, चंद्रमौली रेड्डी 4-0-13-2, विक्रांत बांगर 4-0-18-1) पराभूत वि. केपजेमिनी -17.5 षटकांत 3 बाद 138 (विक्रांत बांगर 58, साकेत देशपांडे 48, ओंकार सोनावणे 4-0-29-1, वैभव जगताप 4-0-26-1). सामनावीर – विक्रांत बांगर.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)