पुणे क्रिकेट ऍकॅडमीचा विजय

लेट सदू शिंदे लीग स्पर्धा

पुणे – नीरज सेनच्या तडाखेबंद 71 धावांच्या आणि गोलंदाजाच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर पुणे क्रिकेट ऍकॅडमीने पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित लेट सदू शिंदे लीग स्पर्धेत रॉयल फिनिक्‍य संघावर 222 धावांनी पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली. फलंदाजीसह गोलंदाजीतही केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे नीरज सेनला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पुणे क्रिकेट ऍकॅडमी संघाने 39 षटकात 346 धावांचा डोंगर उभारला होता. त्यात दोन्ही सलामीवीरांनी चंगळ खेळ केला. प्रतीक पोखनिकर याने 34 चेंडूंत 65 धावांची खेळी केली. तर नीरज सेनने 71 धावा बनविल्या.

त्यानंतर तिसर्या क्रमांकावरील फलंदाज सुरज गोसावी 61, विवेक साका 50 आणि श्रेयश काळेने नाबाद 44 धावांची खेळी करत संघाला 8 बाद 346 धावांचा डोंगर उभारून दिला. प्रत्युत्तरात फलंदाजीस आलेल्या रॉयल फिनिक्‍य संघाला चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यांनी सर्वबाद 124 धावपर्यांतच मजल मारली. पुणे क्रिकेट ऍकॅडमीच्या सिद्धार्थ 4 बळी घेतले तर शुभम गवारीने 2 गडी बाद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)