पिंपरी पॅंथर्स, रोटरी फायरबुल नागपुर संघांचा विजय

आयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धा

पुणे – पिंपरी पॅंथर्स संघाने कोवाई रॉकर्स संघाचा तर रोटरी फायरबुल नागपुर संघाने मिडटाऊन वॉरियर्स सांगली संघाचा पराभव करताना येथे सुरु असलेल्या आयएफसीआर रोटरी डिस्ट्रीक्‍ट 3131 तर्फे आयोजित आयएफसीआर आरपीएल अरबन बॅटल टी 15 स्पर्धेत आगेकुच नोंदवली.

पुना क्‍लब, मुळशी क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात साखळी फेरीत फैताज लांडगेच्या अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर पिंपरी पॅंथरस्‌ संघाने कोवाई रॉकर्स संघाचा 137 धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना फैताज लांडगेच्या 35, सुनिल रोहेलाच्या 21 व अविनाश बारणेच्या 16 धावांच्या जोरावर पिंपरी पॅंथरस्‌ संघाने 15 षटकात 5 बाद 204 धावांचा डोंगर रचला. 204 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शांत वाघेरेच्या अचूक गोलंदाजीसमोर कोवाई रॉकर्स संघ केवळ 12 षटकात सर्वबाद 67 धावांत गारद झाला. फैताज लांडगे सामनावीर ठरला.

तर, दुसऱ्या लढतीत संदीप शिंदेच्या अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर रोटरी फायरबुल नागपुर संघाने मिडटाऊन वॉरियर्स सांगली संघाचा 5 गडी राखून पराभव केला.

सविस्तर निकाल – साखळी फेरी :

पिंपरी पॅंथर्स – 15 षटकांत 5 बाद 204 (फैताज लांडगे 35, सुनिल रोहेला 21, अविनाश बारणे 16, रोहन घाडगे 13, सुमित मंदन 2-36, वसंत कुमार 2-32, आर.वादिवेल 1-31) वि.वि कोवाई रॉकर्स- 12 षटकांत सर्वबाद 67 (वसंत कुमार 21, प्रशांत वाघेरे 3-3, सुनिल मंदन 1-18, शेखर दालमिया 1-7, विजय नवले 1-0), सामनावीर- फैताज लांडगे.

मिडटाऊन वॉरियर्स सांगली – 15 षटकांत 7 बाद 74 (संतोष साखरे 23, जयदिप पाठक 13, समिर सहस्त्रबुध्ये 3-8, सारंग देगवारकर 2-6, दिलिप फोंडे 1-19, संदिप शिंदे 1-6) पराभूत वि रोटरी फायरबुल नागपुर – 9 षटकांत 5 बाद 76 (संदीप शिंदे 33, तुषार देशपांडे 10, संतोष साखरे 3-11, राजेश अंबेकर 1-13) सामनावीर- संदीप शिंदे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)