इंडोशॉटले पीवायसी प्रिमियर लीग : एनएच वुल्वस संघाचा सलग तिसरा विजय

पुणे – गुडलक हॉग्स, टायगर्स, गोल्डफिल्ड डॉल्फिन, आर्यन स्कायलार्कस, ओव्हन फ्रेश टस्कर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना येथे सुरु असलेल्या पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित इंडोशॉटले पीवायसी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीतून आगेकुच केली तर एनएच वुल्वस संघाने आर्यन स्कायलार्कस संघाचा पराभव करत स्पर्धेत सलग तिसरा विजय संपादन केला.

पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्रसाद जाधव नाबाद जलद अर्धशतकी खेळीच्या जोरावर एनएच वुल्वस संघाने आर्यन स्कायलार्कस संघाचा 51धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना प्रसाद जाधवच्या नाबाद 56 व प्रशांत वैद्यच्या नाबाद 31 धावांच्या बळावर एनएच वुल्वस संघाने 6षटकात बिनबाद 95धावा केल्या. 95 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पियुष शर्माच्या अचूक गोलंदाजीपुढे आर्यन स्कायलार्कस संघ 6 षटकात 6 बाद 44 धावांत गारद झाला. 22 चेंडूत प्रसाद जाधव नाबाद 56 व 10 धावात 1 गडी बाद करणारा प्रसाद जाधव सामनावीर ठरला.

-Ads-

अन्य लढतीत रोहन छाजेड याने केलेल्या नाबाद 34धावांच्या जोरावर गोल्डफिल्ड डॉल्फिन संघाने कासट ड्रॅगन्सचा 8गडी राखून पराभव केला. तन्मय चोभे नाबाद 56धावांच्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर ओव्हन फ्रेश टस्कर्स संघाने रेड बुल्स संघावर 2धावांनी विजय मिळवला.

सविस्तर निकाल: साखळी फेरी:

एनएच वुल्वस: 6 षटकांत बिनबाद 95 (प्रसाद जाधव नाबाद 56, प्रशांत वैद्य नाबाद 31) वि.वि आर्यन स्कायलार्कसः 6 षटकांत 6 बाद 44 (अंकुश जाधव 16, पियुष शर्मा 2-4, देवेंद्र राठी 1-5, प्रशांत वैद्य 1-9, अनुज लोहाडे 1-9, प्रसाद जाधव 1-10) सामनावीर प्रसाद जाधव
एनएच वुल्वस संघाने 51धावांनी सामना जिंकला.

कासट ड्रॅगन्स: 6 षटकांत 5 बाद 68 (प्रतीक वांगीकर 25, नितीन सरदेसाई 24, रोहन छाजेड 2-3, नचिकेत जोशी 1-17) पराभूत वि.गोल्डफिल्ड डॉल्फिन: 4.2 षटकांत बिनबाद 69 (रोहन छाजेड नाबाद 34, अश्विन शहा नाबाद 34); सामनावीर-रोहन छाजेड; गोल्डफिल्ड डॉल्फिन 8गडी राखून विजयी.

सुपर लायन्स: 6 षटकांत 4 बाद 50 (संदीप साठे नाबाद 28, श्री शिरोडकर नाबाद 13, उदय जाधव 2-3, समीर जोग 1-4, मंदार चितळे 1-5) पराभूत वि. गुडलक हॉग्स लिमये : 4.2 षटकांत बिनबाद 53 (समीर जोग नाबाद 16, देवेंद्र चितळे नाबाद 31); सामनावीर-उदय जाधव; गुडलक हॉग्स लिमये 8गडी राखून विजयी.

टायगर्स: 6 षटकांत 1 बाद 78 (मधुर इंगहाळीकर नाबाद 35, अभिषेक ताम्हाणे 22, अमित कुलकर्णी नाबाद 16, असीम देवगावकर 1-10) वि.वि. गोखले सिनर्जी कोब्राज: 6 षटकांत 2 बाद 46 (विमल हंसराज 18, विशाल गोखले नाबाद 16, अमित कुलकर्णी 1-16); सामनावीर-मधुर इंगहाळीकर.

आर्यन स्कायलार्कस: 6 षटकांत 4 बाद 65 (जयदीप गोडबोले 16, शार्दुल वाळिंबे 16, बाळ कुलकरन 12, पिनाकिन मराठे 2-9) वि.वि.अंजनेया ब्रेव बिअर्स: 6 षटकांत 5 बाद 53 (गौरव सावगावकर 30, अंजनेया साठे 11, शिवकुमार जावडेकर 10, आदित्य गांधी 2-1, सोहन आंगळे 1-3); सामानावीर-आदित्य गांधी; आर्यन स्कायलार्कस 12 धावांनी विजयी.

ओव्हन फ्रेश टस्कर्स: 6 षटकांत 4 बाद 78 (श्रीनिवास चाफळकर 30, हर्षल गंद्रे 21, शिरीष आपटे 19, तन्मय चोभे 1-3, समीर जोशी 1-5, अभिजित खानविलकर 1-16) वि.वि. रेड बुल्स: 6 षटकांत 2 बाद 76 (तन्मय चोभे नाबाद 56, नंदन डोंगरे 13, दर्शन कांकरिया 1-5, श्रीनिवास चाफळकर 1-9); सामनावीर-तन्मय चोभे; ओव्हन फ्रेश टस्कर्स 2.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)