पाकमधील भारतीयसेनेच्या कारवाईने महापालिकेत आनंदोत्सव

पुणे – पाक मधील जैश च्या तळावर भारतीय सेनेने हल्ला करून दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा आनंद आज महापालिकेत व्यक्त करण्यात आला.

भाजपच्या नगरसेवक धीरज घाटे ,महेश वाबळे आणि कार्यकर्त्यांनी यावेळी तिरंगा होता घेऊन जोरदार घोषणा देवून आनंद व्यक्त केला. त्यापूर्वी भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने महापालिकेच्या परिसरात फटाके फोडत पेढे वाटण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानंतर मुख्य सभेत हि भारतीय सेनेचे अभिनंदन करण्यात आले . सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, विरोधीपक्ष नेते दिलीप बराटे, मनसेचे गटनेते वसंत मोरे, माजी महापौर प्रशांत जगताप, सुभाष जगताप यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)