पुणे – 115 गावांतील नागरिक पितात दूषित पाणी

टीसीएल पावडरही निकृष्ट दर्जाचे : क्‍लोरीनचे प्रमाण 20 टक्‍क्‍यांहून कमी


पाणी, टीसीएल पावडर नमुन्यांच्या तपासणीतून उघड


जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी

पुणे – जिल्ह्यातील 115 गावांमध्ये नागरिक दूषित पाणी पित असल्याचे पाणी तपासणी अहवालातून समोर आले आहे. तर 35 गावांमध्ये पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येत असलेली टीसीएल पावडरही निकृष्ट दर्जाची आहे. या निकृष्ट पावडरमध्ये क्‍लोरीनचे प्रमाण 20 टक्‍क्‍यांहून कमी असल्याचे समोर आले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या पाणी व टीसीएल पावडरच्या नमुने तपासणीत ही बाब उघडकीस आली आहे.

दूषित पाणी पित असलेली सर्वाधिक 21 गावे शिरूर व जुन्नर तालुक्‍यांत आढळून आली असून, खेड व वेल्हे या दोन तालुक्‍यांमधील एकाही गावात पिण्याचे पाणी दूषित आढळलेले नाही. आरोग्य विभागाच्या वतीने दरमहा पिण्याचे पाणी व टीसीएल पावडरच्या दर्जाची तपासणी करण्यात येते. आरोग्य विभागाने जिल्ह्यातील तेरा तालुक्‍यांमधील गावे आणि वाड्या-वस्त्यांमधील 2 हजार 510 पाणी नमुन्यांची तपासणी केली. त्यापैकी 115 गावांमधील पाणी दूषित असल्याचे, तर 35 गावांमध्ये टीसीएल पावडर निकृष्ट असल्याचे दिसून आले.

निकृष्ट पावडर आढळून आलेल्या गावे
मांदळवाडी, अवसरी बुद्रुक, तळेकरवाडी, गंगापुर बुद्रुक, अमोंडी, वडगाव, विठ्ठलवाडी, टाकेवाडी, ठाकरवाडी, निरगुडसर, मेंगडेवाडी, पिंपळगाव व कळंब (सर्व ता. आंबेगाव). सुपा, कुतवळवाडी, खराडेवाडी, कोळोली, तरडोली, बाबुर्डी, काळखैरेवाडी, सोनवडी, सुपे, आंबी बुद्रुक, पानसरेवाडी, भिकोबानगर, धुमाळवाडी (सर्व ता. बारामती). आंबोली, चिल्हेवाडी, धामणखेल, धालेवाडी (सर्व ता. जुन्नर) आणि पिंपरी बुद्रुक, कोहीनकरवाडी, वाडा, बिवी आणि तिफनवाडी (सर्व ता. खेड).

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)