पुलवामा हल्ल्याचे पुणे कनेक्शन, एकास अटक

पुणे – पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.  पुण्यातील चाकण औद्योगिक परिसरातून या दहशतवाद्याला बिहार एटीएसने अटक केली असून, त्याचा संबंध पुलवामा हल्ल्यातील दहशतवाद्यांशी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

जवानांच्या पोस्टिंग डिटेल्सची प्रत जवळ बाळगणाऱ्या संशयित दहशतवाद्यास बिहार एटीएसने पुणे एटीएसच्या मदतीने अटक केली आहे. शरियत अन्वरुल्लाख मंडल असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याचे वय १९ आहे. तो बांधकाम मजूर म्हणून काम करत होता. शरियत हा पश्चिमबंगालचा असून नादिया जिल्ह्ह्यातील बाजीपूरचा रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

काही दिवसांपूर्वी बिहार एटीएसने खेरुळ मंडल आणि अबू सुलतान या दोन बांगलादेशींना अटक केली होती. हे दोन्ही ही आरोपी बंदी घातलेल्या जमात उल मुजाहिदीन बांग्लादेश (जेएमबी) आणि इस्लामिक स्टेट ऑफ बांगलादेश (आयएसबीडी) या संघटनेचे सदस्य आहेत. त्यांच्या चौकशीतून शरियतची माहिती मिळाली आहे. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)