पुणे – कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे अर्ज एकाच दिवशी भरणार

पुणे – पुणे शहर लोकसभा निवडणुकीच्या कॉंग्रेस उमेदवाराच्या संयुक्त प्रचारासाठी आघाडीच्या घटक पक्षांची पहिली संयुक्त बैठक बुधवारी कॉंग्रेस भवनात झाली. यावेळी कॉंग्रेसचे पुण्याचे उमेदवार आणि बारामती लोकसभा निवडणुकीचे उमेदवार यांचा उमेदवारी अर्ज एकाच दिवशी भरण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याशिवाय, या दोन्ही पक्षांची संयुक्त सुकाणू समिती स्थापन करण्यात येणार असून त्या माध्यमातून ब्लॉक तसेच वॉर्ड स्तरावर प्रचाराचे नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांतर्गत प्रत्येक विधानसभा मतदार संघात संयुक्त कोपरा सभा, बैठका तसेच पदयात्रा आणि रॅली काढण्याचे नियोजन केले आहे. राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण, शहराध्यक्ष चेतन तुपे, कॉंग्रेसचे माजी आमदार उल्हास पवार, शरद रणपिसे, दिप्ती चवधरी यांच्यासह महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांच्यासह घटक पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. दरम्यान, केवळ पुणेच नाही तर जिल्ह्यातील आघाडीचे चारही उमेदवार निवडून आणण्यासाठी दोन्ही पक्षांकडून सर्वोत्परी संयुक्त प्रयत्न केले जाणार असल्याचे तुपे या वेळी बोलताना म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)