पुणे -‘कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी’ बोगस

विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नयेत

पुणे – शहरातील लुल्लानगर येथील “कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी’ या संस्थेने विद्यापीठ अनुदान आयोग अथवा कोणत्याही शिखर संस्थेची परवानगी घेतली नाही. त्यामुळे या शैक्षणिक संस्थेत कोणत्याही अभ्यासक्रम अथवा पाठ्यक्रमात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नयेत, अशी माहिती उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी दिली.

लुल्लानगरच्या “प्रमदिप’ इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर “कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी’ कार्यरत आहे. या संस्थेने शासनाची कोणतीच मान्यता नसतानाही संस्थेमार्फत मानद पदव्या दिल्याचे अहवालानुसार निदर्शनास आलेले आहे. ही बाब उच्च शिक्षणातील अनधिकृत संस्था व अनधिकृत अभ्यास पाठ्यक्रम, अधिनियम 2013 मधील तरतुदीचे उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे या शैक्षणिक संस्थेच्या व्यवस्थापनास संस्थेत चालवित असलेले अध्ययनक्रम, अभ्यास पाठ्य्रकम आणि संस्था तत्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे अशा संस्थेत कोणत्याही अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नयेत. असे प्रवेश अनधिकृत असतील. ही बाब सर्व संबंधित विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना जाहीररित्या शासनामार्फत कळविण्यात येत आहे, असेही डॉ. माने यांनी परिपत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)