पुणे – शहरात रस्त्यावरील वाढत्या खड्ड्यांकडे वाहतूकीचा खोळंबा होत आहे. त्यातच महापालिकेकडून गणेश मंडळांकडून खोदण्यात आलेल्या खड्डयांसाठी दंड आकारण्यात येणार आहे. तर दुसरीकडे रस्त्यावरील खड्डयांकरिता ठेकेदार आणि केबल कंपन्या जबाबदार असताना महापालिकेकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. असे असताना मग फक्त गणेश मंडळानाच दंड का? असा काँग्रेस पक्षाने सवाल उपस्थित केला आहे.

शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांकडे प्रशासन व महापालिकेचे लक्ष्य वेधण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या  कार्यकर्त्यांच्या वतीने पुण्यातील रस्त्यावर विट्टी दांडू, गोटया खेळुन आणि वृक्षारोपण करुण आंदोलन करण्यात आले. तसेच शहरातील खड्डे बुजवा अन्यथा महापौरानी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली.

यावेळी माजी महापौर शांतिलाल सुरतवाला,अंकुश काकड़े, माजी उपमहापौर सतीश देसाई,कांग्रेस पदाधिकारी बाबा नायडू,आप्पा शेवाळे ऋषिकेश बालगुडे आदि कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित  होते या आंदोलन सयोंजक प्रदेश सचिव संजय बालगुडे यांनी केले होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)