सर्वसामान्य मेटाकुटीला : पिंपरी-चिंचवड शहरात पेट्रोल 86.48 रूपये तर पुणे शहरात पेट्रोल 86.42 रूपयांवर

पुणे – महागाईने वैतागलेल्या मध्यवर्गीयांच्या चिंतेत आणखी भर पडली असून रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे. शहरात आज सोमवारी ‘पिंपरीचिंचवड’ शहरात पेट्रोलचे भाव 86.48 रूपये तर डिझेलची किंमत 74.26 रुपये इतकी झाली आहे. त्याचबरोबर ‘पुणे’ शहरात पेट्रोलचा भाव 86.42 रूपये आणि डिझेलची किंमत 74.24 रूपये अशी आहे. ही दरवाढ अभूतपूर्व असून स्वातंत्र्यानंतरची सर्वांत उच्चांकी आहे.

शहरात गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्याने बदल होत असल्याचे दिसून येत आहे. आंतराष्ट्रीय बाजारात घडणाऱ्या घडामोडींमुळे देशांतर्गत इंधनाच्या दरांवर होत असून, त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत असल्याचे तेल विक्री करणाऱ्या कंपन्यांकडून सागितले जात आहे.

मात्र सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात पुण्यात पेट्रोलचे दर 1.42 रूपयांनी वाढून 86.42 इतके झाले, तर डिझेलची किंमत 3.24 रुपयांनी वाढून 74.24 रुपये झाली आहे. एकूणच इंधनदरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.

भारतात 80 टक्के इंधन हे परदेशांकडून आयात केले जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात घडणाऱ्या घडामोडींचा परिणाम आपल्याकडील इंधनांच्या किंमतींवर होतो. आगामी काळातदेखील या किंमती वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)