दुधाची पिशवी घेणे पडले 28 लाखांना

पुणे – रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करून दूध आणण्यासाठी गेलेल्या सराफ व्यावसायिकाची नजर चुकवून अवघ्या काही सेकंदात चोरट्यांनी 28 लाख रुपये किंमतीचे 565 ग्रॅमचे सोन्याचे दागिने व इतर मौल्यवान ऐवज ठेवलेली बॅग दुचाकीसह चोरून नेली.

ज्वेलर्सचे दुकान बंद केल्यानंतर सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घरी नेताना शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी राजेश सोलंकी (48, शुक्रवार पेठ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार चोरट्याविरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फिर्यादी हे सराफ व्यावसायिक असून त्यांचे ज्वेलर्स दुकान आहे. रात्री दुकान बंद केल्यानंतर ते दागिने बॅगमध्ये ठेवून घरी नेत असत. शुक्रवारी रात्री ते सोन्याचे दागिने असलेली बॅग दुचाकीला अडकवून शुक्रवार पेठेतील त्यांच्या घरी निघाले होते. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास दूध विकत घेण्यासाठी शिवाजी रस्त्यावरील सुयोग डेअरीसमोर रस्त्याच्या कडेला त्यांनी दुचाकी उभा केली. तसेच उतरताना घाईगडबडीत दुचाकीची चावी आणि बॅग सोबत न घेता ते दूध आणण्यासाठी गेले.

दूध घेऊन परतले असता, चोरट्यांनी दगिन्यांच्या बॅगसह मोपेड दुचाकी चोरून नेल्याचे निदर्शनास आले. खडक पोलीस शिवाजी रोडवरील सीसीटीव्ही चित्रफित पडताळून पाहत आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक व्ही. डी. केसरकर हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)