एनडीआरएफ पथकाकडून नबाव यांना जीवनदान

पुणे – मोहोळ येथे झालेल्या ट्रक आणि टेम्पोच्या अपघातात ट्रकमधील एका व्यक्तीची राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाडून (एनडीआरएफ) सुखरुप सुटका करण्यात आली. चांद नवाब असे त्यांचे नाव आहे, अशी माहिती एनडीआरएफकडून देण्यात आली.

मोहोळ येथे नादुरुस्त रस्त्यावर थांबलेल्या एका ट्रकला आयशर टेम्पोने मागून धडक दिली होती. यामध्ये टेम्पो चालक अली शेख यांचा मृत्यू झाला, तर एक महिला आणि दोन मुले यांना स्थानिक नागरिकांनी बाहेर काढले होते. मात्र, मृत चालक अली आणि त्यांच्या शेजारी बसलेले नबाव यांना बाहेर काढणे अवघड होत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, सोलापूर येथील मॉकड्रील संपवून पुण्याकडे निघालेल्या एनडीआरएफच्या पाचव्या बटालियनच्या जवानांना मोहोल येथे हा अपघातग्रस्त टेम्पो दिसला. एनडीआरएफच्या जवानांनी त्याठिकाणी पोहोचल्यावर मदतकार्य सुरू केले आणि तातडीने हालचाल करून नवाब यांना बाहेर काढले. नवाब हे गंभीर जखमी असून त्यांना स्थानिक पोलिसांच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)