‘सैराट’पणे भाऊजीचा खून करणाऱ्या मेहुण्यासह चौघांना पोलीस कोठडी

पुणे – बहिणीशी प्रेमविवाह केल्याने सैराटपणे भावजीचा खून केल्याप्रकरणात लष्कर पोलिसांनी अटक केलेल्या दोन मेहुण्यांसह चौघांना 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. खून झालेल्याची पत्नी सहा महिने गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे.

मेहुणा अरबाज मोईद्दीन कुरेशी (25) दुसरा मेहुणा फरहाज (वय 21, रा. भिमपुरा, कॅम्प), मोहमद अल्ताफ पटेल (वय 19) आणि जुनेद ईस्माईल कुरेशी (वय 20, दोघेही, रा. कॅम्प) अशी पोलीस कोठडी झालेल्यांची नावे आहेत. सुलतान सय्यद असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत अब्दुल रहेमान इब्राहिम सय्यद (वय 42, रा. महंमदवाडी) यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे.

ही घटना 23 मार्च रोजी कॅम्प येथील एम.जी. रस्ता येथील कुमार प्लाझा कॉर्नरचे जवळ घडली. बहिणीशी प्रमेविवाह केल्याचा कारणावरून दोन मेहुण्यासह चौघांनी चाकुने वार करून तसेच सोडा, कोल्ड्रींगच्या बाटल्या डोक्‍यात मारून सुलतान याचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात चौघांना अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्हाचा अधिक तपास करण्यासाठी चौघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील किरण बेंडभर यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)