घरफोडीच्या दोन गुन्ह्यात गुन्हेगाराला एक वर्ष सक्तमजुरी

दोन्ही गुन्ह्यात मिळून सोळा हजार रुपये दंड

पुणे – अनाधिकृतपणे प्रवेश करून घरफोडी करणाऱ्याला दोन गुन्ह्यात एक वर्षे सक्तमजुरी आणि दोन्हीत मिळून सोळा हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अर्चना पानसरे यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त 15 दिवसाचा कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.

आकाश हेमराज परदेशी (वय 30, रा. ) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. यापूर्वी न्यायालयाने त्याला चार गुन्ह्यात शिक्षा झाल्या आहेत. दोन्ही प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी काम पाहिले. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस हवालदार राहुल शिंदे यांनी मदत केली.

पहिल्या घटनेत दादा प्रभाकर काळे यांनी तक्रार नोंदवली अहे. 21 मार्च 2012 रोजी शेजारी राहणाऱ्या मुलीने मोबाईलवर फोन करून घराचे कुलूप तुटले आहे. दरवाजा उघडे असल्यचे सांगितले. दुपारी 2.20 ते घरी गेले. त्यानंतर त्यांची आईही घरी पोहोचली. त्यामध्ये 15 हजार रुपयांचा सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात एक वर्षे सक्तमजुरी आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

दुसऱ्या गुन्ह्यात सुरेश मुदरमुत्तू सिदबंरम पिल्ले यांनी फिर्याद दिली आहे. 17 मे 2012 रोजी सकाळी 7.30 वाजता फिर्यादी कामाला गेले होते. दुपारी घरी जावून जेवण करून कामाला गेले. पत्नी माहेरी गेली होती. काम सुटल्यानंतर ते पत्नीच्या माहेरी गेले. त्यानंतर रात्री 9.45 ला पत्नीसह घरी गेले. त्यावेळी घराच दरवाजा उचकटलेला दिसला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी 16 हजार रुपये किंमतीचे घरातील साहित्य चोरी झाल्याचे निष्पन्न झाले.

दोन्ही गुन्ह्यात येरवडा पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी ऍड. वामन कोळी यांनी केली. दुसऱ्या प्रकरणात 1 वर्षे सक्तमजुरी आणि नऊ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)