पुणे – वाहतूक नियमांमध्ये बदल

चतु:शृंगी, दत्तवाडी, डेक्‍कन परिसराचा समावेश

पुणे – शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी वाहतूक शाखेकडून चतु:शृंगी, दत्तवाडी, डेक्‍कन परिसरातील नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. “नो पार्किंग’, “नो हॉल्टींग’, “सम-विषम पार्किंग’ आदी स्वरुपाचे बदल केले आहेत, अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली.

-Ads-

चतु:शृंगी वाहतूक विभागांतर्गत येणाऱ्या बी.डी. सावंत चौक ते डॉ. होमी भाभा हॉस्पिटल चौकापर्यंत, तर ओम सुपर मार्केट चौक ते गणेशखिंड रोडपर्यंत सम-विषम पार्किंग करण्यात आली आहे. दत्तवाडी वाहतूक विभागांतर्गत येणाऱ्या वडगाव सर्व्हिस रस्त्याने कात्रजकडे जाणाऱ्या रस्त्यावर खादी कॉटन मार्ट ते डेक्‍कन पॅव्हीलियन हॉटेलपर्यंतच्या परिसरात 60 मीटर अंतरापर्यंत “नो-पार्किंग-नो हॉल्टिंग’ करण्यात आले आहे. सातारा रोड लेनने भूमकर चौकाकडे जाणाऱ्या सर्व्हिस रस्त्यावर चौकापासून 50 मीटरवर “नो पार्किंग’ करण्यात आले आहे.

डेक्‍कन परिसरातील भांडारकर रोड लेन 10 येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला “नो-पार्किंग’ करण्यात आले आहे. तर फर्गसन रस्त्यावरील व्हिनस लेन येथे “नो पार्किंग’ केले आहे. चितळे लेन ते डेक्‍कन जिमखाना गेट क्रमांक एकपर्यंत रस्त्याच्या डाव्या बाजूस चारचाकी वाहनांसाठी समांतर पार्किंग, पी.वाय.सी.क्‍लब गेट एकपासून हॉटेल अजितपर्यंत “नो-पार्किंग’ करण्यात आले आहे.

गजानन महाराज मंदिर लेन येथून उजवीकडे वळण्यास पुंडलीक उर्फ दादा चौधरी चौक येथून गजानन महाराज मंदिर लेनकडे जाण्यास बंदी करण्यात आली आहे. सेंट्रल मॉल जंक्‍शन ते साठे पथ (उजवी बाजू) दुचाकी वाहनांसाठी पार्किंग तर साठे पथ ते मेजर कृ.ग. पवार पथपर्यंत “नो-पार्किंग’ करण्यात आली आहे.

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)