पुणे – शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत बदल

पुणे – छत्रपती शिवजयंती उत्सवानिमित्त विविध संस्था, संघटनांकडून मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. यादरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी शहरातील काही भागांत शनिवारी (दि.23) वाहतूक बदल करण्यात आला आहे.

भवानी पेठेतील भवानी माता मंदिर येथून मुख्य मिरवणुकीला सुरूवात होणार आहे. पुढे ही मिरवणूक रामोशी गेट- चौक-नेहरू रस्ता-संत कबीर चौक-नाना चावडी-नानापेठ-मोतीचौक-जिजामाता चौक-लालमहल चौक येथे विसर्जित होणार आहे.

यात नेहरू रस्ता : पॉवर हाउसकडून सेव्हन लव्हज चौकाकडे जाणाऱ्यांनी कादर चौक – क्वार्टर गेट चौक – जुना मोटार स्टॅन्डमार्गे जावे किंवा पावर हाऊस ते समर्थ पोलीस ठाणे- शांताई हॉटेल- क्वॉर्टर गेटमार्गे जुना मोटार स्टॅंड कडे जावे.

लक्ष्मी रस्ता : टिळक चौकाकडे जाणाऱ्यांनी नेहरू रस्ता-पॉवर हाऊस चौक-अपोलो टॉकिज चौक- फडके हौद-जिजामाता चौक मार्गे जावे * स्वारगेटच्या दिशेने जाण्यासासाठी देवजीबाबा चौक-दारूवाला पूल ते अपोलो सिनेमा ते पॉवर हाऊस चौकातून जावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)