पुणे – निवडणूक काळात परीक्षांच्या वेळापत्रकात बदल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ घेणार निर्णय

पुणे – राज्यात लोकसभा निवडणुका चार टप्प्यांत होत असून, त्याचा तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. मतदानाच्या दिवशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार आहेत. त्यामुळे या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल होणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

-Ads-

पुणे विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांची परीक्षा दि. 12 मार्चपासून सुरू होत आहे. विद्यापीठाशी संलग्नित पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये परीक्षा होणार आहेत. राज्यात दि. 11, 18, 23 आणि 29 एप्रिल अशा चार टप्प्यात मतदान आहे. मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठाकडून परीक्षा पुढे ढकलण्याबाबत होणाऱ्या निर्णयाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. पुणे, नगर, बारामती मतदारसंघाचे मतदान दि.23 एप्रिलला आहे. तर मावळ, शिरूर, शिर्डी, नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघांमध्ये दि.29 एप्रिलला मतदान आहे. दरम्यान, एम.एस्सी. व एम.कॉम.च्या परीक्षा दि.10 एप्रिल ते 23 एप्रिल या कालावधीत होणार आहे. त्यामुळे या परीक्षा पुढे ढकलल्या जातील, अशी शक्‍यता आहे.

या मतदारसंघातील महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्नित आहेत. त्यामुळे दि.23 आणि 29 एप्रिलला मतदानाच्या दिवशी असणारे पेपर पुढे ढकलण्याची शक्‍यता आहे. याबाबत सविस्तर आढावा घेऊन अंतिम निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)