पुणे – सिमेंट रस्ते, जलवाहिन्यांना भरघोस निधी

“स’ यादीत तरतूद : पुन्हा उधळपट्टीचा मार्ग मोकळा


अडीच हजार कोटींचा खर्च केला जाणार


शहरातील 85 टक्‍के रस्त्यांची होणार खोदाई


1600 किलो मीटरच्या नवीन जलवाहीन्या अंथरणार

पुणे – महापालिकेकडून शहरात समान पाणी योजनेसाठी तब्बल अडीच हजार कोटींचा खर्च केला जाणार आहे. या कामासाठी शहरातील सुमारे 85 टक्‍के रस्ते खोदले जाणार असून 1600 किलो मीटरच्या नवीन जलवाहीन्या टाकल्या जाणार आहेत. असे असतानाही, स्थायी समिती अध्यक्षांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात सिमेंट रस्ते आणि जलवाहिन्यांच्या कामासाठी “स’यादीत भरघोस निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे एका बाजूला रस्ते खोदाई होतानाच सिमेंटचे रस्ते केले जाणार असून दुसऱ्या बाजूला अनावश्‍यक पणे जलवाहीन्या टाकण्याच्या कामावरही खर्च होणार असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.

महापालिकेकडून या आर्थिक वर्षात समान पाणी योजनेचे काम वेगाने सुरू केले जाणार आहे. असे असतानाच, दुसऱ्या बाजूला शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्त्यांची कामे केली जात आहेत.तर दुसरीकडे नगरसेवकांच्या “स’ यादीतून जलवाहीन्या टाकल्या जात आहेत. ही बाब लक्षात घेऊन या कामांना महापालिकेकडून पुढील काही वर्षांसाठी मर्यादा घालण्याचे प्रयत्न सुरू असतानाच; दुसऱ्या बाजूला महापालिकेच्या अंदाजपत्रकात मोठ्या प्रमाणात ही दोन्ही कामे प्रस्तावित केली आहेत. त्यासाठी जवळपास 250 कोटींचा निधी प्रस्तावित केला असून तो खर्ची न पडल्यास त्याचे वर्गीकरण होणार आहे. त्यामुळे अंदाजपत्रक सादर करतानाच, आर्थिक शिस्त तसेच वित्तीय बचतीचा उल्लेख केला जात असतानाच; दुसऱ्या बाजूला नगरसेवकांची मर्जी राखण्यासाठी या दोन्ही कामांसाठी करण्यात आलेल्या तरतूदीमुळे लाखो रुपयांची अनावश्‍यक उधळपट्टी होणार असल्याचे चित्र आहे. या शिवाय, महापालिकेच्या पथ विभागानेही 100 कोटींचे सिमेंट रस्ते प्रस्तावित केले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)