पुणे कॅन्टोन्मेंट बॅंकेची “भारत बिल पेमेंट सुविधा’ 

पुणे कॅन्टोन्मेंट बॅंकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविला असून बॅंक लवकरच ग्राहकांकरिता युनायटेड पेमेंट इंटरफेस सुविधा उपलब्ध करणार आहेत. त्यामुळे इंटरनेट आधारित आधुनिक सुविधा ग्राहकांना सहज उपलब्ध होऊ शकतील. आगामी काळातही बॅंक या क्षेत्रात पुढाकार घेणार आहेत. 
-कैलासराव (मामा) सखाराम कोद्रे 
संस्थापक व अध्यक्ष, पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बॅंक 

ग्राहकांना लाईट, पाणी, टेलिफोन, मोबाइल बिल भरता येणार 

पुणे – 3 नोव्हेंबर रोजी पुणे कॅन्टोन्मेंट बॅंकेच्या संचालक मंडळ सभेत संस्थापक- संचालक, विद्यमान अध्यक्ष कैलासराव (मामा) सखाराम कोद्रे यांच्या हस्ते डिजिटल बॅंकिंगची, भारत बिल पेमेंट ही सुविधा ग्राहकांच्या सेवेत सुरू करण्यात आली. या सुविधेअंतर्गत लाईट बिल, पाणी बिल, टीव्ही रिचार्ज, टेलिफोन बिल, मोबाइल बिल, इंटरनेट बिल इत्यादी सुविधांचा लाभ शाखेत ग्राहकांना विनाशुल्क घेता येईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबरोबरच बॅंकिंगच्या आधुनिक डिजिटल सुविधा बॅंकेने उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामध्ये एटीएम, पॉस, ईकॉम, आयएमपीएस, आरटीजीस, एनईएफटी मोबाइल बॅंकिंग इ. सुविधा तसेच गॅस सबसिडीही आपल्या बॅंकेत जमा होत आहे.
लवकरच ग्राहकांकरिता (यूपीआय) युनायटेड पेमेंट इंटरफेस ही सुविधा उपलब्ध करून देत आहोत. त्याचप्रमाणे सुरू असलेल्या सर्व प्रकारच्या कर्जसुविधा, ठेव योजनेचा लाभ घ्यावा व ग्राहक सेवा करण्याची संधी द्यावी.

नुकतेच बॅंकेच्या ढोले पाटील रोड व येरवडा शाखेत एटीएम सुविधा ग्राहकांच्या सेवेकरिता सुरू केली आहे. सध्या बॅंकेचे एकूण 7 शाखांमध्ये एटीएम सुविधा उपलब्ध आहेत. बॅंकेच्या सप्टेंबर 2018 अखेर ठेवी रु. 256 कोटी 20 लाख, कर्ज वितरण 137 कोटी 09 लाख, निव्वळ नफा 1 कोटी 10 लाख, ऑडिट वर्ग “अ’ आहे. तसेच कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य आहे.

याप्रसंगी बॅंकेचे उपाध्यक्ष नंदकिशोर बिडकर, संचालक कैलासभाऊ कोद्रे, मंगल टिळेकर, पोपटराव गायकवाड, नितीन मोझे, रमेश कोद्रे, कुंडलिक शिंदे, अविनाश कवडे, देविदास भाट, स्मिता लडकत, सुरेश भालेराव संजय फटके, सुनील मोझे, संतोष पेठे (सी.ए.). ऍड. दिलीप जगताप, सेवक प्रतिनिधी अरुण जवळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश पाटील, सरव्यवस्थापक विजय कोंद्रे, ईडीपी विभागप्रमुख सुनील जमदाडे, अस्लम तांबोळी व सेवक वर्ग तसेच ग्राहक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)