पुणे – मतदानासाठी बसेसचा संचलनाला फटका

पीएमपीकडून अनेक बसफेऱ्या रद्द

पुणे – लोकसभा निवडणुकीत अधिकारी, कर्मचाऱ्या यांसह निवडणूकीसंदर्भातील वस्तूंची ने -आण करण्यासाठी पहिल्या टप्यात पीएमपीएलकडून 361 बसेस पुरवण्यात आल्या. यामुळे मंगळवारी नियोजित बसेस कमी होऊन दैनंदिन संचलनास काही प्रमाणात फटका बसल्याचे दिसून आले. दरम्यान, शासकीय सुट्टी असल्याने पीएमपी प्रवाशांची संख्या कमी असल्याने जास्त फटका नसल्याचा दावा पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आला आहे. तरीही प्रत्येक बसच्या दिवसाला सरासरी 3 ते 4 फेऱ्या होतात, ही बाब पाहता जवळपास 1200 ते 1300 फेऱ्या रद्द झालेल्या आहेत.

लोकसभा निवडणूकीच्या पाश्वभूमीवर दरवर्षी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएल) जिल्हा प्रशासनाला बसेस पुरवण्यात येतात. यावर्षी निवडणुकीसाठी एकूण 724 बसेस उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात दोन टप्प्यांमध्ये निवडणुका होत असून पुणे आणि बारामती मतदारसंघात (दि.23 ) मंगळवारी मतदान पार पडले. तर, मावळ आणि शिरुर मतदारसंघात येत्या दि.29 रोजी मतदान होणार आहे. या पहिल्या टप्प्यासाठी 361 बसेस पुरवण्यात आल्या. शहरातील विविध भागात या बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. दरम्यान, ताफ्यातील सुमारे साडेतीनशे बसेस कमी झाल्याने याचा फटका दैनंदिन संचलनाला बसल्याचे दिसून आले.

पुरवण्यात आलेल्या बसेस
वडगावशेरी – 85
शिवाजीनगर – 60
कोथरुड – 67
पर्वती – 71
कॅन्टोन्मेंट – 50
कसबा – 28

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)