पुणे – अंदाजपत्रकात उत्पन्नवाढीचे स्रोत नाहीत

विरोधकांची टीका : सत्ताधाऱ्यांकडून मात्र पाठराखण

पुणे – “दीड हजार कोटी रुपये तूट असलेले आणि उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याचे प्रयत्न न करता सुचवलेले हे अंदाजपत्रक आहे,’ अशी टीका महापालिकेतील विरोधकांनी स्थायी समिती अध्यक्षांनी मांडलेल्या अंदाजपत्रकावर केली. तर सत्ताधारी नगरसेवकांनी अंदाजपत्रकाची पाठराखण केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“सर्वांना बरोबर घेऊन जाणारे हे अंदाजपत्रक आहे,’ असे ज्योत्स्ना एकबोटे म्हणाल्या. “स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा वर्षभर घ्याव्यात. जमेची बाजू कमकुवत असून, मिळकतकर वसुलीकडे लक्ष दिले पाहिजे. मिळकतकराबरोबरच होर्डिंग्ज, टेलिफोन टॉवर, या गोष्टींचा विचार केला पाहिजे. शहराची लोकसंख्या 30-40 लाख आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयननिहाय शववाहिन्या उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, प्रत्येक भागासाठी अग्निशमन केंद्र उभारली पाहिजेत,’ असे प्रवीण चोरबेले यांनी नमूद केले.

“सोलापूर रस्त्यावर खूप अपघात होतात. या रस्त्याला नगररोड प्रमाणेच प्राधान्य द्यावे,’ असा टोला नाना भानगिरे यांनी लगावला. स्थायी समिती अध्यक्षांनी आपल्या अंदाजपत्रकात नगररस्त्याला झुकते माप दिले आहे. त्यावरून भानगिरे यांनी वरील मत व्यक्त केले. याशिवाय “भामा-आसखेडचे काम पूर्ण झाल्यानंतर लष्कर पाणी पुरवठा केंद्राला पाणी देऊन हडपसरलाही पाणी द्यावे. अंदाजपत्रकात केलेले नियोजन पूर्ण करावे,’ असेही भानगिरे म्हणाले. “शहराची वाहतूक कोडी कमी करण्यासाठी ट्रॅफिक वार्डन नियुक्ती उपयोगी ठरणार आहे,’ असे मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.

फक्‍त पूर्व भागासाठी चांगली तरतूद मिळाल्याची तक्रार ज्योती कळमकर आणि अनिल टिंगरे यांनी केली. लहुजी साळवे स्मारकासाठी निधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी स्वाती लोखंडे यांनी केली. तर, हे निवडणुकीचे अंदाजपत्रक आहे. ते फुगवल्याचे आणि विरोधकांना दुजाभाव केले आहे. सॅलिसबरी पार्क येथे 14 लाख रुपयांचे एक अशी 23 कोटी रुपयांची झाडे लावतात. येथे आम्हाला साधी झाडे मिळवण्यासाठी झगडावे लागते. कुत्र्यांच्या नसंबदीसाठी दरवर्षी कोट्यवधी खर्च होतात परंतु भटक्‍या कुत्र्यांची संख्या मात्र कमी होत नाही,’ असे लोणकर म्हणाल्या. याशिवाय मिळकतकराची थकबाकी वसूल होत नसल्याबाबतची नाराजीही त्यांनी व्यक्त केली.

“डिजिटल लिटरसी चांगली योजना आहे. त्याविषयी जनजागृती करणारी गाडी प्रभागातून फिरवली जाते आणि महिलांना लाईटबिल, फोनबिल आणि अन्य बिले मोबाइलवरून भरण्याविषयी शिकवले जाते हा उपक्रम चांगला आहे. फिरता दवाखाना हा उपक्रम ज्येष्ठांनाही उपयोगी पडणारी आहे. याशिवाय हडपसर वारकरी सांस्कृतिक भवनाबद्दल तरतूद केल्याबद्दल आभारी आहोत,’ असल्याचे उज्ज्वला जंगले म्हणाल्या.

“भटक्‍या कुत्र्यांविषयी नसबंदी शस्त्रक्रिया साठी जशी तरतूद केली तशी डुकरांची संख्या आटोक्‍यात आणण्यासाठी काही उपाययोजना केली असती, तर बरे झाले असते,’ असे कालिंदा पुंडे म्हणाल्या.

“सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडी खूप आहे. रोजच त्याचा सामना करावा लागत आहे. दोन, तीन, चार चाकी वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते. ती सोडवण्यासाठी उड्डाणपुलाची तरतूद केल्याबद्दल अनिता कदम यांनी स्थायी समिती अध्यक्षांचे आभार मानले. तसेच महिलांसाठी कर्करोग निदान चाचणीसाठी तरतूद केल्याबद्दलही आभार मानले.

सर्वसमावेशक अंदाजपत्रक सादर केल्याचे अल्पना वर्पे म्हणाल्या. स्वच्छ प्रभाग स्पर्धा ठेवल्यामुळे स्वत:चा प्रभाग स्वच्छ ठेवण्यासाठी सगळे जागरूक राहतील. गदिमांच्या नावे स्मारक करत असल्याबद्दलही वर्पे यांनी आभार मानले.

नगररस्ता येथील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपुलाला प्राधान्य दिले आणि भामा आसखेड प्रकल्पाची तरतूद केल्याबद्दल मुक्ता जगताप यांनी समाधान व्यक्त केले. शहराचा विकास समतोल करण्यासाठी प्रयत्न अंदाजपत्रकात केल्याचे श्‍वेता गलांडे म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)