एस. दीपक, पीएल. प्रसाद यांना विजेतेपदाचा मान

तिसरी राष्ट्रीय एलिट बॉक्‍सिंग स्पर्धा

पुणे – तिसऱ्या राष्ट्रीय एलिट बॉक्‍सिंग स्पर्धेमध्ये एस. दीपक, पीएल. प्रसाद, मदन लाल, मनीष कौशिक यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना वेगवेगळ्या वजनी गटाचे विजेतेपदे पटकावताना सुवर्ण कामगिरी केली आहे. पुरुषांच्या 46 ते 49 किलो वजनी गटात झालेल्या पहिल्या सामन्यात एस.दीपक याने हिमांशू शर्माचा पराभव करत आपल्या वजनी गताचे विजेतेपद पटकाविताना सुवर्णपदक पटकावले.

तर, हिमांशूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तर, 52 किलो वजनी गटात पीएल प्रसाद आणि अनंत चोपडा यांच्यात अंतिम सामना झाला. यात पीएल प्रसाद याने विजय मिळवतान सुवर्णपदकाची कमाई केली. तर, अनंत चोपडाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तर 56 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात मदन लाल यांनी गौरव बिधुरी यांचा पराभव करत अंतिम सामना आपल्या नावे करताना सुवर्णपदकाची कमाई केली.

गौरव बिधुरीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तर, 60 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात मनीष कौशिकने अंकुश दहियाचा पराभव करताना सुवर्न कामगिरी केली. यावेळी अंकूश दहियाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
तर यावेळी 64 किलो वजनी गटात रोहित टोकसने सुवर्णपदक पटकावले तर अभिषेक यादवने रौप्यपदक पटकावले. तर वेल्टर वेट 69 किलो वजनी गटात दुर्योधनसिंग नेगी याने दिनेशचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. तर, दिनेशला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

तर 75 किलो वजनी गटात मनजीत सिंग यांनी प्रयाग चौहान याचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. तर, 81 किलो वजनी गटात मनीष पनवर यांनी ब्रिजेश यादवला नमवताना सुवर्नकामगिरीची नोंद केली. तसेच 91 किलो वजनी गटात संजीत याने प्रवीण कुमार याचा पराभव केला. तर पुरुषांच्या सुपर हेवी वेट 91 किलो पेक्षा जास्तच्या वजनी गटात सतीश कुमारने जसवीर सिंग याचे तागडे आव्हान मोडून काढत. विजेतेपद पटकाविले.

ही स्पर्धा येथे आर्मी स्पोर्टस इंस्टीट्युट येथे 27 ऑक्‍टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. यात सांघिक प्रकारात सर्व्हिसेसच्या संघाने पहिले स्थान मिळवले तर रेल्वेचा संघ दुसऱ्या क्रमांकावर राहिला. चीफ ऑफ स्टाफ यांनी विजेतेपदाची चषक सर्विसेसच्या संघाला प्रदान केला. त्यात त्यांनी आर्मी स्पोर्टस इन्स्टिटयूट आणि बॉक्‍सिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या सर्व आयोजकांची उत्तम आयोजनासाठी स्तूती केली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांच्यासह उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)