भाजपाचा ‘लोकसभा संकल्प’: पालिकेच्या अंदाजपत्रकात घोषणांचा पाऊस

अंदाजपत्रकाने पार केला 6 हजार कोटींचा टप्पा


भाजपचा लोकसभा अंदाजपत्रक

पुणे : महापालिकेचे 2019- 20 चे सुमारे 6 हजार 765 कोटीचे अंदाजपत्रक महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी शुक्रवारी मुख्यसभेत सादर केले. पायाभूत सुविधासाठी निधी देण्यास या अंदाजपत्रकात प्राधान्य देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले तरी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या अंदाजपत्रकात पुणेकरांवर घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. त्यामुळे या अंदाजपत्रकातही भाजपच्या जाहिरानाम्याची छाप असल्याचे दिसून येते. दरम्यान महापालिका आयुक्त राव यांनी या वर्षासाठी 6 हजार 85 कोटीचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यात स्थायी समिती अध्यक्षांनी 680 कोटींची वाढ केली आहे. महापालिका आयुक्तांनी आपल्या अंदाजपत्रतात नवीन योजनांना कात्री लावली होती. मात्र, स्थायी समिती अध्यक्षांनी या योजनांसह इतर नवीन योजना मोठ्या प्रमाणात प्रस्तावित केल्या आहेत. त्यात प्रामुख्याने नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. तर महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या 11 गावांसाठी 196 कोटींचा निधी देण्यात आला आहे.

या आहेत नवीन योजना
– आवास योजने अंतर्गत 10 हजार नवीन घरे
– नगर रस्त्यासाठी स्वतंत्र वाहतूक आराखडा
– सिंहगड रस्ता उड्डाणपूल : राजाराम पूल ते फनटाइम
–  11 गावासाठी 200 कोटी
–  शहरात ट्राफिक वॉर्डन
– गदिमा स्मारक कोथरूड मध्ये होणार
– दृष्टीहिना सोबत मदतनिसला मोफत बस प्रवास
– औषधासाठी सॉफ्टवेअर
– प्रत्येक विभागासाठी 5 पुष्पक गाड्या
– 19 प्रसृतीगृहात महिलांसाठी कॅन्सर केंद्र
– अपघात कर विमा योजनेत बदल करणार
– शहरातील उद्याने संपूर्ण दिवस विद्यार्थ्यांसाठी खुली करणार
– कल्याणी नगर क्रीडा संकुल
– अधिकारी पदाधिकाऱ्यासाठी ई कार
– सकाळच्या वेळेत सहा फिरते दवाखाने
– रात्र प्रशालेतील मुलांना मोफत पुस्तके- नवीन अग्निशमन केंद्र
– समान पाणीपुरवठा योजने’मुळे पुणेकरांना २४ तास पुरेसे पाणी मिळणार. यासाठी ३०१ कोटी ४० लाख रुपयांची तरतूद
– भामा-आसखेड प्रकल्पाचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

– पुणे शहराच्या सर्वंकष वाहतूक आराखड्यात १९५.२६ किमीचे मेट्रो मार्ग प्रस्तावित
– वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पाषाण-सूस येथे उड्डाण पूल उभारण्यात येणार
– ‘उच्चतम क्षमता द्रुतगती मार्ग’ (एचसीएमटीआर) प्रकल्प १९८७ च्या विकास आराखड्यात प्रस्तावित.  शहरातील प्रमुख साठ रस्त्यांना जोडणारा ३६ किलोमीटर लांबीचा व २४ मीटर रुंदीचा प्रकल्प
– राष्ट्रीय नदी संवर्धन योजने’अंतर्गत मुळा-मुठा नदीचे प्रदूषण नियंत्रित करण्याचा प्रकल्प हाती
– महिलांसाठी कर्करोग निदान चाचणी


असा येणार 2019-20 रुपया
वस्तू व सेवा कर – 30 पैसे
मिळकतकर – 28 पैसे
शहर विकास शुल्क – 13 पैसे
इतर जमा – 11 पैसे
पाणी पट्टी – 7 पैसे
कर्जरोखे – 6 पैसे
शासकीय अनुदान – 4 पैसे
शासकीय अनुदान 1- पैसा


असा जाणार रुपया
विकासकामे – 48 पैसे
सेवकवर्ग – 25 पैसे
घसारा, पेट्रोल- 15 पैसे
वीजखर्च, दुरुस्ती – 4 पैसे
पाणी खर्च – 3 पैसे
अमृत, जेएनएनयुआरएम- 2 पैसे
क्षेत्रीय कार्यालय – 1 पैसा
वॉर्डस्तरीय कामे – 1 पैसा
कर्ज परतफेड, व्याज – 1 पैसा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)